corona cases in kolhapur : कोल्हापुरातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:38 IST2021-06-01T10:37:38+5:302021-06-01T10:38:45+5:30

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढत असून, सोमवारी नव्या १९१९ रुग्णांची भर पडली आहे. ४० जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोल्हापूर शहरातील ११ जणांचा समावेश आहे. १२९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Corona cases in Kolhapur: Death of 11 corona victims in Kolhapur | corona cases in kolhapur : कोल्हापुरातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

corona cases in kolhapur : कोल्हापुरातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

ठळक मुद्देकोल्हापुरातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू नवे १९१९ रुग्ण, एकूण ४० जणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचीही संख्या वाढत असून, सोमवारी नव्या १९१९ रुग्णांची भर पडली आहे. ४० जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोल्हापूर शहरातील ११ जणांचा समावेश आहे. १२९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रुग्णसंख्या कमी येत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनला मुदतवाढ दिली आहे. परंतु सकाळी होणारी गर्दी कमी व्हायला तयार नाही. शिवाय दिवसभरातील रस्त्यावरील वर्दळही वाढली आहे.

कोल्हापूर शहरात ४३३ नवे कोरोनाग्रस्त आढळले असून, करवीर तालुक्यातील ३०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगले तालुक्यात १८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांची आकडेवारी

कोल्हापूर ११
बोंद्रेनगर, मंगेशकरनगर, हनुमाननगर, यादवनगर, सानेगुरुजी वसाहत, ताराबाई पार्क, दादू चौगुलेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कळंबा रोड, श्रीकृष्णनगर फुलेवाडी २

करवीर ०६
पाचगाव, कंदलगाव, शिये, चिंचवडे, गिरगाव, गोकुळ शिरगाव

हातकणंगले ०६
नवे चावरे, जंगमवाडी, कुंभोज, चंदूर, नागाव, हुपरी

गडहिंग्लज ०४
नेसरी, गिजवणे, नूल, अत्याळ

कागल ०३
चिंचवाड, बेनिक्रे, कागल

इचलकरंजी ०२
जवाहरनगर, कोरोची

आजरा ०२
सुलगाव, आजरा

पन्हाळा ०१
मल्हार पेठ

शिरोळ ०१
राजापूर

शाहूवाडी ०१
आंबा

इतर ०३
निपाणी, मीरा-भाईंदर, बेंगलोर

Web Title: Corona cases in Kolhapur: Death of 11 corona victims in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.