corona cases in kolhapur : १४५३ नवे रुग्ण, २१७५ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:11 IST2021-06-09T12:08:52+5:302021-06-09T12:11:14+5:30
corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजार ७६८ वर आला आहे. नवे १४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona cases in kolhapur : १४५३ नवे रुग्ण, २१७५ जण कोरोनामुक्त
कोल्हापूर : जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजार ७६८ वर आला आहे. नवे १४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरात ३३३ नवे रुग्ण आढळले असून करवीर तालुक्यात २४० तर हातकणंगले तालुक्यात २१७ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. करवीर तालुक्यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल हातकणंगले आणि पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू
- करवीर १०
दऱ्याचे वडगाव, बालिंगा, गोकुळ शिरगाव, वसगडे, शिये, वाकरे, कळंबा २, येवती, निगवे दुमाला
- हातकणंगले ०७
नागाव, तासगाव, नवे चावरे, हुपरी, तारदाळ, आळते, कासारवाडी
- पन्हाळा ०७
पणुत्रे, पणुंद्रे, यवलूज, पोर्ले २, वाघवे, बोरपाडळे
- कोल्हापूर ०६
शास्त्रीनगर, फुलेवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, शनिवार पेठ, सुधाकरनगर
- शिरोळ ०३
नांदणी, कवठेसार, तेरवाड
गडहिंग्लज ०३
मनवाड, हुनगिनहाळ, कोरज
- आजरा ०२
पेद्रेवाडी, खेडे
- कागल ०२
सार्वर्डे बुद्रुक, कागल
- चंदगड ०१
अडकूर
- इचलकरंजी ०१
शहापूर
- इतर ०२
सावर्डे आकुलगाव, सांगली