शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Corona vaccine: बूस्टर डोसकडे सर्वसामान्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:23 IST

तिसऱ्या लाटेतील कोरोना फारसा त्रासदायक नसल्याने कदाचित होत आहे दुर्लक्ष

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यात बूस्टर डोससाठी लस उपलब्ध असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लाटेतील कोरोना फारसा त्रासदायक नसल्याने कदाचित हे दुर्लक्ष होत असले तरी याबाबत आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.जिल्ह्यात १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने जनजागरण मोहीमही हाती घेतली. त्यानंतर १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाले. त्याला शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.दरम्यानच्या काळात या बूस्टर डोसच्या मोहिमेकडे थाेडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यामुळे नागरिकांनीही यासाठी फारसा उत्साह दाखवलेला नाही, त्यामुळेच आतापर्यंत महिन्याभरात आरोग्य कर्मचाऱ्यांचे केवळ ३१ टक्के, फ्रंटलाइन वर्कर ३२ टक्के, ६० वर्षांवरील २५ टक्के असे एकूण २७ टक्केच काम झाले आहे.कोणाला मिळाला बूस्टर         बूस्टर मिळाला               बूस्टर बाकीआरोग्य कर्मचारी                        ६,५७९                            १४,७४२फ्रंटलाइन वर्कर                          ७,१३९                             १५,४५०ज्येष्ठ नागरिक                            २४,३३९                           ७४,१३१

कोणत्या तालुक्यात किती बूस्टर दिले?तालुका            बूस्टरआजरा             ८५३भुदरगड           ६८७चंदगड            १,०८३गडहिंग्लज      २,३२०गगनबावडा      १५१हातकणंगले     ७,५११कागल             १,२९२करवीर            ३,५५४पन्हाळा           १,९३३राधानगरी         १,७१५शाहूवाडी         १,२२१शिरोळ            ३,८९२कोल्हापूर महापालिका ११,८४५एकूण             ३८,०५७

का नाही घेतला बूस्टर?नाव सांगण्यास नकार देण्यााऱ्या कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेण्यास अनेक कारणे असल्याचे सांगितले. काहीजणांनी अजून ९ महिने पूर्ण झालेले नाहीत, आजारपण आहे, नेमके कारण नाही; पण घेतला नाही, अशी कारणे सांगितली.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक यांनी बूस्टर डोस घेण्याची गरज आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने सांगण्यात आली आहे. यासाठी जनजागरण करण्यात आले आहे. यासाठीचे आवश्यक डोसही उपलब्ध आहेत; परंतु या बूस्टर डोस घेण्यासाठीची अनेकांची आग्रही मानसिकता दिसत नाही. वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत दिशा ठरवली जाईल. -डॉ. फारुक देसाई, समन्वयक, लसीकरण समन्वयक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस