corona in belgaon : बेळगावात दोघेजण कोरोनामुक्त, कर्नाटकात नवीन 63 पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:38 IST2020-05-20T15:38:05+5:302020-05-20T15:38:59+5:30
कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत.

corona in belgaon : बेळगावात दोघेजण कोरोनामुक्त, कर्नाटकात नवीन 63 पॉझिटिव्ह रुग्ण
बेळगाव : कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत.
बुधवारी रायबाग कुडची येथील दोघांचे नमुने सलग दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले त्यामुळे त्यांना बिम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे .कुडची येथील एकूण 24 जण पॉझिटिव्ह आले होते त्यापैकी 21 जण निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळं कुडची गावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे चालली आहे.
या अगोदर जिल्ह्यात 67 जण निगेटिव्ह झाले होते आजचे दोघे पकडून हा आकडा देखील वाढला आहे 69 वर पोहोचला आहे. बुधवारी मेडिकल बुलेटिन मध्ये राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात एकही रुग्ण वाढला नाही.