शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

corona in belgaon : बेळगावात कोरोना बाधित महिलेचा पती, भाऊ, वाहनचालकांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:50 IST

मुंबईहून बेळगावात बेकायदेशीर रित्या प्रवेश केलेल्या तिघांवर ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देबेळगावात कोरोना बाधित महिलेचा पती, भाऊ, वाहनचालकांवर फौजदारीमुंबईहून बेकायदेशीररीत्या प्रवेश, माहिती लपवून ठेवली

प्रशासन आक्रमक- बेळगावात पोजिटिव्ह महिलेच्या पती, भाऊ व कारचालकावर गुन्हा दाखलबेळगाव : मुंबईहून बेळगावात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या तिघांवर ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या पी 974 या 27 वर्षीय सदाशिवनगर बेळगाव येथील महिलेचा पती, भाऊ, वाहनचालक या तिघांच्यावर मनपा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी अपेडेंमिक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत आय पी सी कलम 269,270,188,201,202 आणि आर/डब्ल्यू 34नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदाशिवनगर सारख्या उच्चभ्रू वसाहतीत कोरोनाने प्रवेश केल्याने त्या भागात वास्तव्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या घराजवळच कोरोना बाधित महिलेचे घर आहे.गेल्या 3 मे रोजी ई पास नसल्याने त्यांना कोगनोळी चेक पोस्ट वर थांबवण्यात आले होते. काही तास ती महिलाही तेथे थांबली होती, नंतर त्यांनी चेक पोस्टवरील अधिकाऱ्यांना विनवण्या करून बेळगावला जाण्याची परवानगी घेतली होती.

बेळगावला गेल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार असेही बजवण्यात आले होते, पण बेळगावात आल्यावर ती गर्भवती महिला आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी क्वारंटाइनचे सगळे नियम धाब्यावर बसवले होते.

ही महिला आपल्या अन्य कुटुंबातील सदस्यासोबत घरी बंदिस्त रहाणे अपेक्षित होते, पण ही महिला सकाळच्या वेळी आपल्या वडिलांच्या सोबत मॉर्निंग वॉक करत होती. यावेळी ओळखीच्या व्यक्तीं बरोबर रस्त्यावर थांबून वार्तालाप होत होता. त्या महिलेचे वडील आणि भाऊ त्यांच्या संपर्कात अनेक लोक अलीकडच्या काळात आले आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहे.

आरोग्य खाते आणि जिल्हा प्रशासनाने या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे तर त्यांच्या घरी येऊन कोण कोण भेटून गेलेत याचीही माहिती घेण्यात येत आहे. प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांनाही क्वांरंटाइन केले जाणार आहे.हे आहे आवाहनबेकायदेशीररीत्या प्रवेश केलेल्यानी माहिती लपवून ठेवली तरी त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. बाहेरून बेकायदेशीर रित्या आलेल्या व्यक्तींची माहिती नागरिकांना कळल्यास त्यांनी (0831)2407290 या जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर