corona in belgaon -पुन्हा बेळगावला दणका...तब्बल ११ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:17 PM2020-05-08T13:17:52+5:302020-05-08T13:19:24+5:30

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनने खळबळ माजवली. जिल्ह्यात एका दिवसात ११ रुग्णांची वाढ झाली आहे.

corona in belgaon - Belgaum hit again ... 11 corona patients | corona in belgaon -पुन्हा बेळगावला दणका...तब्बल ११ कोरोना बाधित रुग्ण

corona in belgaon -पुन्हा बेळगावला दणका...तब्बल ११ कोरोना बाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देपुन्हा बेळगावला दणका...तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना बाधितांचे एकूण संख्या ८५

बेळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनने खळबळ माजवली. जिल्ह्यात एका दिवसात ११ रुग्णांची वाढ झाली आहे.

गेल्या कांही दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याने समाधान व्यक्त होत असतानाच गुरुवारी हिरेबागेवाडी येथील एका मुलीला करण्याची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे एकूण संख्या ८५ झाली आहे.

नव्याने आढळून आलेले कोरोनाग्रस्त रुग्ण हिरेबागेवाडी येथील १० तर रायबाग कुडची १ असून हॉट स्पॉट असणाऱ्या याठिकाणी कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते कसोशीने प्रयत्न करत आहे.

लॉक डाऊन शिथिल झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती. अलीकडे तीन दिवसात २१ जण मुक्त झाले होते त्यामुळे लवकरच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काल गुरुवारी हिरे बागेवाडी येथील १३ वर्षीय मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, काल गुरुवारी सायंकाळी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २४९ स्वॅबच्या नमुन्यांपैकी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या ७४( १) वरून ८५ (१) पर्यंत पोचली आहे. नव्याने आढळून आलेले रुग्ण हे १० हिरेबागेवाडी तर एक रायबाग - कुडचीमधील आहेत. 

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याची हि तिसरी वेळ आहे. याआधी गेल्या १६ एप्रिल रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी १७ रुग्ण आढळून आले होते.

त्यानंतर ३० एप्रिल रोजी एकाच दिवशी १४ कोरोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर आता शुक्रवार दि. ८ मे २०२० रोजी जिल्ह्यात ११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील ही तिसरी वेळ आहे की दहापेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत यामुळे सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत यांचा आकडा ८५ वर पोहोचला आहे.

Web Title: corona in belgaon - Belgaum hit again ... 11 corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.