CoronaVirus Kolhapur-कोरोनाचे नवे ७३ रुग्ण, एकाचा मृत्यू, शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 12:41 IST2021-03-25T11:45:25+5:302021-03-25T12:41:59+5:30
CoronaVirus Kolhapur- गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७३ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे ३० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. सोमवार पेठ, मिरज येथील ७८ वर्षीय पुरुषाचा येथील खासगी इस्पितळात मृत्यू झाला.

CoronaVirus Kolhapur-कोरोनाचे नवे ७३ रुग्ण, एकाचा मृत्यू, शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश
कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७३ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे ३० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. सोमवार पेठ, मिरज येथील ७८ वर्षीय पुरुषाचा येथील खासगी इस्पितळात मृत्यू झाला.
आजरा तालुक्यात दोन, भुदरगड एक, हातकणंगले चार, करवीर दहा, पन्हाळा एक, शाहूवाडी दोन, शिरोळ तालुक्यात तीन, नगरपालिका क्षेत्रात पंधरा आणि इतर जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेले पाच असे रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.
दिवसभरात ५९३ जणांची तपासणी करण्यात आली असून, १०६३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ११३ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, ६०२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.