कोरोनाचे नवे ११ रूग्ण, कणकवलीच्या एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:24 IST2020-12-28T20:23:48+5:302020-12-28T20:24:54+5:30
CoronaVirus Kolhapur- गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ११ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता केवळ ७१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचे नवे ११ रूग्ण, कणकवलीच्या एकाचा मृत्यू
ठळक मुद्देकोरोनाचे नवे ११ रूग्ण, कणकवलीच्या एकाचा मृत्यू८९४ जणांचे स्वॅब, ११० जणांची अँटिजेन टेस्ट
कोल्हापूर : गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ११ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता केवळ ७१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ५ नवे रूग्ण आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ४० वर्षांच्या कोरोनाग्रस्त महिलेचा येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. २६४ जणांची दिवसभरामध्ये तपासणी करण्यात आली असून, ८९४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ११० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.