शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

कोपार्डेत अटीतटीची तिरंगी लढत

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले

कोपार्डे : जनावरांच्या बाजारामुळे जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे समोर असलेल्या सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील व माजी सदस्य एस. के. पाटील यांच्यामध्ये अटीतटीची दुरंगी लढत होणार, असे चित्र स्पष्ट असले तरी लोकसभेचे अपक्ष उमेदवार बजरंग पाटील यांनीही चार प्रभागांत आपले सात उमेदवार उभे करून तिरंगी काटा लढतीचे चित्र निर्माण केले आहे. विकासासाठी एकमुखी बहुमत द्यावे, हा एकच नारा घेऊन मतदारांसमोर कारभारी गेले आहेत.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विलास पाटील यांनी सात जागा मिळवत बहुमत मिळविले. मात्र, सरपंचपदाचे मागासवर्गीय आरक्षण असल्याने आणि विलास पाटील गटाची एकही मागासवर्गीय महिला निवडून न आल्याने बहुमत नसतानाही एस. के. पाटील गटाच्या मंगल कांबळे यांना सरपंचपद देणे भाग पडले. येथून राजकीय अटीतटीला सुरुवात झाली. दोन्ही गटांच्या राजकीय इर्ष्येने विकासापेक्षा एकमेकांचे उट्टे काढण्याला सुरुवात झाली. यातून अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस एकमेकांविरुद्ध देण्यापर्यंत मजल गेली. ग्रामसभेत हेवेदावे काढून विकासाचे निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. यातून अडीच कोटींची पेयजल योजना पाच वर्षांपासून लोंबकळत पडली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले, पण श्रेयवादातून साधा ठराव ग्रामपंचायत सदस्यांना आ. नरके यांना देता न आल्याने मंदिराचे काम रखडले आहे.ग्रामस्थांच्या जिव्हाळ््याचा प्रश्न म्हणजे प्लॉट वाटप. यातही राजकीय श्रेयवादाचा प्रश्न करून आता लोकसंख्या वाढल्याने जागेसाठी अडचणीत सापडले. एकूणच गेल्या पाच वर्षांत योजना आल्या दारी पण राजकीय अनिच्छा पडली भारी. यामुळे विकासालाच खो बसला आहे.आता ग्राम पंचायतीत बहुमतात व सत्तेत असणारे दोन गट आमने-सामने आले आहेत. या दोन्ही गटांनीही विकास हवा असेल, तर स्पष्ट बहुमताबरोबर सरपंच आरक्षण असलेल्या उमेदवारालाही निवडणूक द्या, अन्यथा कोणतेच काम होऊ शकणार नाही, अशी हाक मतदारांना द्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही गट आपणच गावचा विकास करणार, असा नारा करीत असले, तरी हे दोन्ही गट आपल्या राजकीय स्वार्थापोटी विकासाचा गळा घोटत आहेत, असा आरोप करीत लोकसभेचे उमेदवार पै. बजरंग पाटील यांनी चार प्रभागांत सात उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे. तर विद्यमान उपसरपंच सागर जामदार हे विलास गटातून उमेदवारी न मिळाल्याने आपली पत्नी रूपाली जामदार यांना रिंगणात उतरविले आहे. एकूणच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या गटातच दुरंगी लढत होणार असली, तरी पै. बजरंग पाटील यांच्या पॅनेलचा गटाला फायदा किंवा तोटा होणार, तर सागर जामदार आली आपली ताकद इतर प्रभागात कोणाला देणार, यावरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)