शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारामुळे सहजीवन समृद्ध

By admin | Updated: July 23, 2015 00:12 IST

नीता मगदूम : एस. आर. पाटील यांच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित व्याख्यान

 कोल्हापूर : सहकाराच्या माध्यमातून सुरू झालेल्या दूध संस्थांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व्यवहार करता आले, त्यांचा आत्मविश्वास वाढला. सहकारामुळेच सहजीवनाची परिभाषा बदलून ते समृद्ध झाले, असे मत अ‍ॅड. नीता मगदूम यांनी केले. रयत सेवा कृषिउद्योग सहकारी संघ आणि एस. आर. पाटील विकास ट्रस्टतर्फे सहकार शिरोमणी एस. आर. पाटील यांच्या १३व्या पुण्यतिथिनिमित्त येथील शाहू स्मारक भवनात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. ‘सहकारातून फुलले सहजीवन’ हा व्याख्यानाचा विषय होता. अ‍ॅड. मगदूम म्हणाल्या, सहकार हा गोरगरिबांच्या कष्टातून उभा राहिला आहे; पण सध्या सहकारात भ्रष्टाचाराचा शिरकाव होत आहे. श्रेयवादाच्या राजकारणात सहकार मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. अशा प्रवृत्ती सहकाराला धोकादायक आहेत. गावगाड्यामधून सहकार निर्माण झालेला आहे. त्यामुळे सहकाराकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याला निश्चित चांगले दिवस येतील, असा विश्वासही मगदूम यांनी व्यक्त केला. मगदूम म्हणाल्या, एस. आर. पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून सहकार हा लोकजीवनाचा मार्ग आहे, हे दाखवून दिले. पाटील यांनी ‘शेतकरी भविष्य निर्वाह निधी’ ही योजना सुरू केली. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व अ‍ॅड. नीता मगदूम यांच्या हस्ते एस. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाचे अध्यक्ष आनंदराव यादव, एस. आर. पाटील विकास ट्रस्टच्या विश्वस्त अ‍ॅड. मंगला पाटील-बडदारे, खजानीस चिंतामण गुरव, विश्वस्त पी. डी. पाटील, बाबासो पाटील-भुयेकर, नामदेव कांबळे, ऊर्मिला पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, माधुरी जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)