शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत एका महाविद्यालयात पेहरावावरुन वाद, पोलिसांचा सौम्य लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 19:04 IST

इचलकरंजी : येथील एका  महाविद्यालयात धार्मिक पेहराव करण्यावरुन आज, शुक्रवारी वाद निर्माण झाला. यावेळी दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर मोठ्या ...

इचलकरंजी : येथील एका महाविद्यालयात धार्मिक पेहराव करण्यावरुन आज, शुक्रवारी वाद निर्माण झाला. यावेळी दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर मोठ्या संख्येने जमले. दोन्हींकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींची प्राचार्यांच्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली. पेहरावाबाबत सोमवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, महाविद्यालयात सकाळी दोन महाविद्यालयीन युवक भगवे स्कार्प घालून आले होते. त्यावेळी त्यांना सुरक्षारक्षाक आणि शिक्षकांनी प्रवेशद्वारात अडवले. यावेळी वाद झाला. दरम्यान हिजाब घालून आलेल्या काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही प्रवेशद्वारात थांबवण्यात आले. याबाबतची माहिती समजताच दोन्ही समाजाचे समर्थक मोठ्या संख्येने महाविद्यालयाबाहेर जमा झाल्याने तणाव निर्माण झाला.

घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, निरीक्षक राजू ताशिलदार, सत्यवान हाके, प्रविण खानपुरे हे स्ट्रायकींग फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर महाविद्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस