शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Kolhapur: शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा, पन्हाळ्याच्या शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:13 IST

उपवनसंरक्षक चेन फेन्सिंगचा प्रस्ताव पाठविणार

कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी, लक्ष्मी कुरणासह परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सुमारे ३५०० एकर शेतीच्या गव्यांमुळे झालेल्या नुकसानीला पायबंद घालण्याची मागणी उपवनसंरक्षक जी. गुरु प्रसाद यांच्याकडे केली. त्यावर यासंदर्भात या शेतकऱ्यांसाठी चेन फेन्सिंगचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी आणि लक्ष्मी कुरणासह परिसरातील ३५०० एकर शेतीमध्ये ६०० कुटुंबातील शेतकरी पूर्णपणे पावसावरच अवलंबून कायमस्वरूपी शेती करतात. पाच वर्षांपासून त्यांच्या शेतीमध्ये शिरून गव्यांचे कळप शेतीपिकाचे नुकसान करत आहेत. एकावेळी सुमारे ४० ते ५० गव्यांचा कळप पिकात शिरतो. गव्यांच्या भीतीने शेतकरी, विशेषत: महिला शेतकऱ्यांनी घाबरून शेताकडे जाणे बंद केले आहे.गव्यांच्या नुकसानीसंदर्भात वनविभागाने वेळोवेळी पंचनामे केले आहेत. परंतु नुकसानीच्या तुलनेत अतिशय अल्प स्वरूपात भरपाई मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. येथील वनविभागाच्या वनशेतीभोवती सौरकुंपण आहे, तथापि शेतकऱ्यांच्या शेतीभोवती सौरकुंपण नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी या शेतीभोवती सौरकुंपण करण्याची मागणी केली आहे.चेन फेन्सिंगचा प्रस्तावजी. गुरुप्रसाद यांनी प्रति ६०० मीटरप्रमाणे सुमारे तीन किलोमीटर परिसरात चर मारण्याचा अथवा चेन फेन्सिंग करण्याचा प्रस्ताव करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च येणार असल्यामुळे त्याची तरतूद करण्यासाठी डीपीडीसी आणि राज्य सरकारकडे निधीचा प्रस्तावही डिसेंबरअखेर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन जी. गुरुप्रसाद यांनी या शेतकऱ्यांना दिले. शशिकांत पोवार, कुमार चिले, अमर जाधव, आनंदा उदाळे, प्रमोद उदाळे, तानाजी काशीद, जयसिंग उदाळे, महेश भाडेकर यांच्यासह १०० शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग