शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात सहकाराचा मोलाचा वाटा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 19:14 IST

महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिवर्तनात सहकाराचा मोठा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे.

कोल्हापूर‍ : महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिवर्तनात सहकाराचा मोठा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे. हा सन्मार्ग छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी दाखवून दिलेला आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कार्य करीत आहे. त्यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सर्वांगिण परिवर्तन करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

8 जुलै 1917 रोजी स्थापन झालेल्या दी कागल को- ऑपरेटिव्ह बँक, लि. कागल या बँकेच्या शतकमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक, लि. कागल असे नामकरण कागल येथे आयोजित नामकरण सोहळ्यात करण्यात आले. 

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक, प्रविणसिंह घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल - मुख्यमंत्रीराज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी आधारच्या माध्यमातून करुन पारदर्शी कर्जमाफी करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6 हजार 500 कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे 10 लाख शेतकऱ्यांची यादी पुन्हा 10 लाख शेतकऱ्यांची यादी अशा पद्धतीनं कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावर श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने आयोजित केलेल्या दिलखुलास मुक्त संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वारणा उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्त संवाद कार्यक्रमाद्वारे शेतकरी,ऊस उत्पादक, दूध उत्पादक, लोक प्रतिनिधी,सहकारी संस्थाचे पदाधिकारी, महिला बचत गट, कामगार, शिक्षक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर