अत्यावश्यक सेवेतील ठेकेदारांची रक्कम त्वरित द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:25+5:302021-06-01T04:18:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेने अत्यावश्यक सेवेतील जलशुद्धीकरण केंद्राकरिता ब्लिचिंग व टीसीएल पावडर पुरवणाऱ्या ठेकेदारांची रक्कम गेल्या ...

Contractors for essential services should be paid immediately | अत्यावश्यक सेवेतील ठेकेदारांची रक्कम त्वरित द्यावी

अत्यावश्यक सेवेतील ठेकेदारांची रक्कम त्वरित द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने अत्यावश्यक सेवेतील जलशुद्धीकरण केंद्राकरिता ब्लिचिंग व टीसीएल पावडर पुरवणाऱ्या ठेकेदारांची रक्कम गेल्या पाच महिन्यांपासून दिलेली नाही. या साहित्याचा पुरवठा खंडित झाल्यास शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे त्वरित अत्यावश्यक सेवेतील रक्कम द्यावी या मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावकर यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना दिले.

निवेदनात, पालिकेकडील जलशुद्धीकरण केंद्रास ब्लिचिंग व टीसीएल पावडर पुरविण्याचे अंदाजपत्रक १७ सप्टेंबर २०१९ ला मंजूर झाले असून, पालिकेने जीईएम पोर्टलवरून साहित्य खरेदी केले आहे. तरीही अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ठेकेदाराची रक्कम दिलेली नाही. मात्र, मार्च अखेरीस अनेक ठेकेदारांची कोट्यवधी रुपये पालिकेच्या अधिकारी व पदाधिकारयांकडून बेकायदेशीरपणे दिली. त्यामुळे ठेकेदाराने पावडर देण्यास नकार दिला आहे. काही दिवसांनी पावसाळा सुरू होत असून, आजारांचे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने प्रक्रियेविना पाणीपुरवठा केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे जलशुद्धीकरणासाठी लागणाऱ्या पावडरचा पुरवठा होण्यासाठी तातडीन निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

Web Title: Contractors for essential services should be paid immediately