शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Rain Update Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा संततधार, पंचगंगेची पाणी पातळी ३२.०७ फुटावर

By राजाराम लोंढे | Updated: July 11, 2022 14:22 IST

राधानगरी धरण ५७ .६७ टक्के भरले. धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळ पासून पावसाची पुन्हा संततधार सुरु झाली आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी ३२.०७ फुटावर पोहचली आहे. गगनबावड्यासह पश्चिमेकडील सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होऊ शकते.काल, रविवारी दुपारनंतर पावसाने काहीसी उसंत घेतली होती. त्यामुळे नद्यांची पातळी हळूहळू कमी होत जात असतानाच आज सकाळ पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. एक सारखा पाऊस कोसळत असल्याने हवेत गारठा पसरला आहे. नद्यांचे पाणी वाढत असल्याने जिल्ह्यातील ४० बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतूक काहिसी विस्कळीत झाली आहे.धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राधानगरी धरण ५७ .६७ टक्के भरलेगेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये १२४.७२ दघलमी पाणीसाठा आहे. आज सकाळी सात वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात ४.४० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात ९७. मी.मी इतका पाऊस झाला आहे. तर एकुण पाऊस १२०४ मी. मी झाला आहे. आज अखेर धरण ५७.६७ टक्के भरले आहे.तुळशी जलाशयात १.६८ टीएमसी पाणीसाठा असून धरण ५१.२५ टक्के भरले आहे. दूधगंगा धरणामध्ये ११.०१ इतका पाणी साठा असून ४३.३६ टक्के धरण पाणीसाठी आहे. आज सकाळ पासून राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर जुलै अखेर धरण भरण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

तुळशी ५०.३७ दलघमी, वारणा ४९८.४४ दलघमी, दूधगंगा ३११.८० दलघमी, कासारी ४७.८४ दलघमी, कडवी ३७.८५ दलघमी, कुंभी ४२.४० दलघमी, पाटगाव ५५.९१ दलघमी, चिकोत्रा २२.९३ दलघमी, चित्री २३.९९ दलघमी, जंगमहट्टी १८.५० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ २२.२५, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी