उजळाईवाडीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:53+5:302021-07-05T04:16:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव: उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटल समोरील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (क्रमांक ...

The container overturned when the driver lost control in Ujlaiwadi | उजळाईवाडीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला

उजळाईवाडीत चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला

लोकमत न्यूज नेटवर्क

उचगाव: उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटल समोरील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (क्रमांक एच.आर ए ए- ७८५४) वरील चालकाचा ताबा सुटल्याने शनिवारी रात्री नऊ वाजता झालेल्या अपघातामध्ये तिघे जखमी झाले. सदर कंटेनरने दुभाजक व कंटेनर समोरून जाणाऱ्या कार क्रमांक (एम.एच-०९-बीएम-१९८७) ला पाठीमागून धडक देत कंटेनर रस्त्याच्या कडेला एका बाजूस पलटी झाला. सदर अपघातामध्ये कंटेनर चालक हकीम अब्दुल वाहिद (वय वर्षे ३० रा. रामपूर ता. सदर जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश), सुरेश शंकरराव नलवडे (वय वर्षे ३१ रा. हनुमाननगर, उजळाईवाडी) व कार चालक कुणाल हितेंद्र पाटील (वय वर्ष २७ रा. राजारामपुरी, कोल्हापूर) हे तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघाताची फिर्याद जखमी सुरेश नलवडे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सनदी करीत आहेत.

०४कंटनेर ॲक्सिडेंट

उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर पलटी झाला असून, तिघे जखमी झाले आहेत.

Web Title: The container overturned when the driver lost control in Ujlaiwadi