शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : रविकांत तूपकर सदाभाऊ खोत यांच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:01 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले आहे. त्यांना बुलढाण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; पण ‘रयत’ऐवजी ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देरविकांत तूपकर सदाभाऊ खोत यांच्या संपर्कातबुलढाण्यातून उमेदवारीची मागणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले आहे. त्यांना बुलढाण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; पण ‘रयत’ऐवजी ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी तूपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे तूपकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; पण शुक्रवारी तूपकर यांनी आपले एकेकाळचे सहकारी असलेले सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले.

भाजपचा पर्याय मागे ठेवण्यामागे शुक्रवारी व्हायरल झालेला व्हिडीओ असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरोळमधील जाहीर सभेत तूपकर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून ‘मी भाजपमध्ये येणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवू नका. आत्महत्या करायची वेळ आली तरी भाजपमध्ये मरेपर्यंत जाणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. समाजमाध्यमांवरून या क्लिपने चांगलाच धुमाकूळ घातला.सदाभाऊ खोत यांनी आज, शनिवारी बोलावलेल्या बैठकीला तूपकर यांना निमंत्रित केले आहे. त्यांनी चिखली अथवा बुलढाणा या जागा मागितल्या आहेत; पण चिखली हा मतदारसंघ भाजपकडे आहे, तर बुलढाण्यावर शिवसेनेने हक्क सांगितला आहे.

युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ घटकपक्षांना सोडायचे ठरले तर येथून तूपकर यांना उतरविण्याची खेळी सदाभाऊ खोत यांनी खेळल्याची चर्चा आहे; पण भाजपने घटकपक्षांना जागा सोडतानाच ‘कमळ’ या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. 

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSadabhau Khotसदाभाउ खोत kolhapurकोल्हापूर