शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

बांधकाम कामगारप्रश्नी पुन्हा तीन दिवसांनी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:06 IST

बांधकाम कामगारांचे जास्तीत जास्त अर्ज येत्या तीन दिवसांत निकाली काढू, त्यानंतरच बैठक घेऊ, अशी औपचारिक चर्चा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि सहसचिव शिवाजी मगदूम यांच्याशी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केली. 

ठळक मुद्देबांधकाम कामगारप्रश्नी पुन्हा तीन दिवसांनी बैठकऔपचारिक झाली चर्चा : जास्तीत जास्त अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन

कोल्हापूर : बांधकाम कामगारांचे जास्तीत जास्त अर्ज येत्या तीन दिवसांत निकाली काढू, त्यानंतरच बैठक घेऊ, अशी औपचारिक चर्चा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि सहसचिव शिवाजी मगदूम यांच्याशी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केली. बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला, कामगारांचे नोंदणी झालेले अर्ज निकाली काढा, बंद केलेला मेडिक्लेम पुन्हा सुरू करा, घरबांधणीसाठी सुमारे साडेपाच लाख रुपये अनुदान द्या, आदी मागण्यांसाठी सोमवारी (दि. १६) लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता.

त्यावेळी सहायक कामगार आयुक्त अलिन गुरव हे कामानिमित्त बाहेर गेल्याने विविध मागण्यांसाठी संघटनेचे नेत्यांसोबत बुधवारी बैठक घेण्याचे मान्य केले होते; पण संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी औपचारिक चर्चा झाली.

सहायक आयुक्त गुरव यांनी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अचानक लागण्याची शक्यता असल्याने चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा येत्या तीन दिवसांत जास्तीत जास्त अर्ज निकाली काढू व त्यानंतरच चर्चा करू, असे सुचविले. त्यानुसार पुढील तीन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.

  • बांधकाम अवजारे खरेदीसाठीचे सुमारे ६८७७ बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंब्बित आहेत.
  • पैकी १५४७ अर्ज निकाली काढले.
  • विविध लाभांपासून वंचित असे २००० बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत.
  • पैकी १६७ अर्ज निकाली काढले.

 

 

टॅग्स :Labourकामगारkolhapurकोल्हापूर