शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळगडावर उत्खनन करणे पडले भारी, बांधकाम व्यावसायिकाला ५७ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:56 IST

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर प्रवासी कर नाक्याच्या दक्षिणेस पुरातन हरिहरेश्वर मंदिर, नागझरीच्या परिसरात चालू असलेल्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने तत्काळ ...

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर प्रवासी कर नाक्याच्या दक्षिणेस पुरातन हरिहरेश्वर मंदिर, नागझरीच्या परिसरात चालू असलेल्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाने तत्काळ कारवाई केली आहे. उत्खननाचा पंचनामा करून ते उत्खनन अनधिकृत ठरवत पन्हाळा तहसीलदारांनी उत्खनन करणाऱ्या सतीश भोसले यांना ५७ लाखांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.पन्हाळगडावरील नागझरी या ठिकाण नजीकची बांधकाम व्यावसायिक सतीश भोसले यांनी जमीन खरेदी केली आहे. भोसले यांनी खरेदी केलेली जमीन उताराची असल्याने त्यांनी बांधकाम करण्यासाठी तेथे उत्खनन करून जमीन सपाटीकरण केले आहे. या उत्खनामुळे पौराणिक महात्म्य लाभलेल्या नागझरी शेजारी मोठ्या दगड मातीचा भराव काढून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून नागझरी, हरिहरेश्वर मंदिर तसेच लगतच्या घरांना भुस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याची तत्काळ दाखल घेत महसूल प्रशासनाने उत्खनन झालेल्या ठिकाणी पंचनामा केला. पंचनाम्यानंतर केलेल्या चौकशीअंती ते उत्खनन अनधिकृत ठरवले. त्यानुसार पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिक सतीश भोसले यांना ५७ लाख १५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावत लेखी खुलासा मागितला आहे.