शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूरकरांना दिलासा; सांगलीत अजूनही धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:19 IST

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ; अलमट्टीतून विसर्ग वाढला, शिरोळमध्ये परिस्थिती गंभीरच

कोल्हापूर : अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.शिरोेळमध्ये सुमारे १२० लष्कराच्या जवानांनी चार बोटीच्या साहयाने मोहीम राबवली. पावसामुळे स्थलांतरासाठी अडचणी आहेत. पूरबाधित गावात लोकांच्या खाण्यापिण्यासाठी बोटीतून साहित्य प्रशासन यंत्रणा पाठवत आहे.सुमारे ७७ छावण्यामध्ये पूरग्रस्त दाखल झाले आहेत, शासनाची मदत नसतानाही सेवाभावी संस्थामार्फत पूरग्रस्त्तांना जेवण, चहा, नाष्टा दिला जात आहे. पुराच्या पाण्याने वेढलेल्या अनेक गावातील पूरग्रस्तांनी सुमारे तीनशे हून अधिक जनावरांचे दावे तोडून दिले.दरम्यान शुक्रवारी मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली. शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या मदतीच्या बैठकीत ६० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना उपस्थिती दर्शवत लागेल ती मदत देण्याची ग्वाही दिली.४०० कोटींचे नुकसानगेल्या पाच दिवसांत पुराच्या पाण्यामुळे असंख्य दुकाने , रुग्णालये, घरे, नागरिकांच्या पार्किंग केलेल्या चारचाकी, दुचाकी ,आदींचे बेसुमार नुकसान झाले आहे. यात विविध विमा कंपन्यांच्याकरीता सर्व्हेअरचे काम करणाऱ्या जाणकारांकडून सुमारे ४०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कºहाड, पाटणमधील पूर ओसरत असून जिल्ह्यातील ७ हजार ७५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले असून, त्यांची तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर