शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election: कोल्हापूर ‘उत्तर’मधून काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी; सत्यजित कदम यांच्यासोबत होणार थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 23:30 IST

आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाल्याने ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा रिक्त झाली होती.

कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी, माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Chandrakant Jadhav) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी दिल्लीतून जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यामुळे आता ‘उत्तर’मध्ये जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात सरळ लढत होणार आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाल्याने ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा रिक्त झाली होती. जाधव यांच्या शोकसभेवेळीच पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी घोेषणा सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. जयश्री जाधव या २०१५ च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर ‘सम्राटनगर’ प्रभागातून मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. नगरसेविका म्हणून त्यांचा कोल्हापूर शहरात संपर्क आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.

क्षीरसागर नॉट रिचेबल -कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल असल्याचे समजते. क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत आहे. 

खरे तर, ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांनी लढवण्याची तयारी केली होती. यासाठी त्यांनी दोन-तीन मेळावे घेऊन निवडणुकीची तयारीही केली होती. मात्र राज्यातील महाविकास आघाडीमुळे त्यांना थांबावे लागले.

क्षीरसागर समर्थकांची नाराजी - मैत्रीपूर्ण लढत झाली तर त्याचा राज्याचा राजकारणावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती आघाडीच्या नेत्यांना आहे. यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारासोबत राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून क्षीरसागर यांना देण्यात आले होते. यामुळे क्षीरसागर समर्थकांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली. काँग्रेस नेत्यांसह इतरांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शुक्रवारी दुपारीपासूनच ते नॉटरिचेबल असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांतून सांगण्यात आले होते. त्याचबरोबर क्षीरसागर समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमानेही उघडपणे नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस