शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: ‘अजितदादांचा’ स्टेटस लागला; राहुल पाटलांच्या प्रवेशाचा विषय रंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:17 IST

प्रवेशावरुन पाटील गटात दोन मतप्रवाह

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चाचपणी सुरू केली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे स्टेटस पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही लावले होते. याची करवीर, राधानगरी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून, ‘दादांचे स्टेटस लागले; भय्यांचा’ प्रवेश निश्चित, अशी जोरदार चर्चा झाली.राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सुरू आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून चर्चेला उधाण आले असून, प्रवेशावरून त्यांच्या गटात दोन मतप्रवाह आहेत. त्यांनी प्रवेश करणार असे जाहीर केले नसले तरी ते करवीर व राधानगरीतील गटातील प्रमुखांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा, या उद्देशाने राहुल पाटील यांची सध्या संपर्क मोहीम आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलला झळकल्याने त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला बळ आले आहे.

‘पी. एन.’ यांचा संयम आणि ताकददिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्यात सहा वेळा विधानसभेची निवडणूक लढवली, त्यात दोनच वेळा विजय मिळाला. चार टर्म म्हणजेच वीस वर्षे आमदारकी नसताना आपला गट एकसंध ठेवून जिल्ह्यात वजन कायम ठेवले होते. पक्षनिष्ठा हाच त्यांच्या राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग राहिला. परंतु, राहुल पाटील हे मात्र एकाच पराभवानंतर अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी किमान पाच वर्षे तरी संयम ठेवून काम करावे, अशी काही पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.

बहुतांशी पक्षांतराची इच्छाकरवीर, पन्हाळा, राधानगरी तालुक्यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांची पक्षांतराची इच्छा असल्याचे सांगितले जात असले तरी ते आयुष्यभर काँग्रेसच्या हातासोबत राहिले, त्या सामान्य कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता दिसते. या घडामोडीमागे कारखान्याचे अर्थकारण, गोकुळमध्ये सत्तारुढ पॅनेलमध्ये संधी, असेही काही पदर आहेत.

जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील हे बाहेरगावी आहेत. ते आज गुरुवारी येणार आहेत. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आम्ही अजून कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे यात गैर काय ? - राहुल पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर