चंदगडला काँग्रेसतर्फे भाजप सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:12+5:302021-06-09T04:30:12+5:30
चंदगड : चंदगड तालुक्यात काँग्रेसतर्फे भाजप सरकारने वाढविलेल्या पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांच्या नेतृत्वाखाली ...

चंदगडला काँग्रेसतर्फे भाजप सरकारचा निषेध
चंदगड : चंदगड तालुक्यात काँग्रेसतर्फे भाजप सरकारने वाढविलेल्या पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले.
कोवाड, नागणवाडी, कार्वे येथील पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध केला. कार्वे येथील बेळगाव - वेंगुर्ला मार्ग येथील आंदोलनाने काहीकाळ वाहतूक खोळंबली. दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या जीवनातील अच्छे दिन निघून गेल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार चंदगड तालुक्यात तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नागनवाडी, कोवाड, कार्वे पेट्रोल पंप येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एम. जे. पाटील, कल्लाप्पा भोगण, राजेंद्र परिट, बाळासाहेब हळदणकर, नगरसेवक अभिजीत गुरबे, जे. बी. पाटील, जयसिंग पाटील, संदीप नांदवडेकर, कलीम मदार, उदय देसाई, उत्तम पाटील, प्रदीप पाटील, जनार्दन देसाई, मेहताब नाईकवाडे, गोमटेश वणकुंद्रे, पांडू लासे, सुधाकर बांदिवडेकर, तुकाराम पाटील, कल्लाप्पा पाटील, विष्णू नाईक, परशुराम रेडेकर, राजू मरगळे, उत्तम उपलकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात भाजप सरकारचा निषेध काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई, बाळासाहेब हळदणकर, राजेंद्र परिट, आदींनी केला.
क्रमांक : ०७०६२०२१-गड-०३