शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीत राष्ट्रवादीला काँग्रेसचा विरोध

By admin | Updated: July 31, 2014 23:32 IST

करवीरचे राजकारण : ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेवर काँग्रेसमधून नाराजी

राशिवडे : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची शाई वाळण्याअगोदरच राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन करीत आहेत. प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीला राज्यात आघाडी झाली तरीही राधानगरी तालुक्यातील काँग्रेसची साथ असणार नाही, अशी भूमिका राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगले, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, उदयसिंह पाटील, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. ते म्हणाले की, आतापर्यंत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांत जिल्ह्यात उच्चांकी मते देऊन निवडून आणले. लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी तालुक्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला करवीरपाठोपाठ मताधिक्य दिले. राधानगरी-भुदरगडचे राष्ट्रवादीचे नेते काम झाले की काँग्रेस कार्यकर्त्यांना कवडीची किंमत देत नाहीत. गावागावांत भांडणे लावण्याचा उद्योग करतात. भोगावती कारखाना आणि शिक्षण मंडळामध्ये या मंडळींनीच राजकीय वाद वाढविले आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी करवीरमधून लाखमोलाची मदत केली, म्हणून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला, याचे भान न ठेवता याच पी. एन. पाटील यांच्याविरोधात ए. वाय. पाटील विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत असतील तर आम्ही त्यांना विधानसभेला मदत का करायची? राज्यात आघाडी झाली तरी राधानगरी-भुदरगडमध्ये आम्ही काँग्रेसह समविचारी गट विधानसभेला राष्ट्रवादीला मदत करणार नाही. विकासकामांत अडचणी, कार्यकर्त्यांना होणारा राजकीय त्रास व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वासघातकी स्वभाव असेल तर त्यांच्याविरोधात ठाम राहून त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.संजयसिंह पाटील, किशाबापू किरूळकर, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, ‘बिद्री’चे संचालक विजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, पंचायत समितीचे सदस्य जयसिंग खामकर, नंदकुमार सूर्यवंशी, जगदीश लिंग्रस, रमेश वारके, अ‍ॅड़ बी. जी. खांडेकर, धीरज डोंगळे, सुधाकर साळोखे, ए. डी. चौगुले यांच्यासह भोगावती-बिद्री कारखान्याचे माजी संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)