शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

gram panchayat election: कोल्हापुरात काँग्रेसने उघडले विजयी खाते, कळंबा सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:43 IST

आमदार सतेज पाटील यांनी गट एकसंघ ठेवला

अमर पाटीलकळंबा : करवीर तालुक्यातील यशवंतग्राम निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या, राजकीय दृष्ट्या संवेदनशील कळंबा गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाच्या सुमन विश्वास गुरव यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. आज, अर्ज माघार घेण्याच्या विहित मुदतीत इच्छुक अन्य तिन्ही महिला उमेदवारांनी माघार घेतली. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील कळंबा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या इतर मागासवर्गीय महिला आरक्षित निवडणुकीसाठी महाडिक गटाला उमेदवार मिळाला नाही. तर आमदार सतेज पाटील गटाकडून माजी सरपंच वनिता सागर भोगम, अश्विनी जाधव, सुमन विश्वास गुरव, वैशाली दिलीप टिपूगडे या इच्छुक होत्या. टिपूगडे व जाधव यांनी आमदार पाटील यांच्या सुचनेनुसार तात्काळ माघार घेण्याचा शब्द दिला. तर विनिता भोगम, सुमन गुरव निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. आज, बुधवारी सकाळी आमदार सतेज पाटील यांनी दोन्ही महिला उमेदवारांची मते जाणून घेऊन सुमन विश्वास गुरव यांचे नाव निश्चित केले. विहित मुदतीत विनिता भोगम यांनी अर्ज माघार घेतल्याने सुमन गुरव यांची बिनविरोध निवड झाली. गट एकसंघ दोन महिला इच्छुक उमेदवारांतून प्रबळ उमेदवार निवडताना मोठी कसरत होणार होती. आमदार सतेज पाटील यांनी सागर भोगम यांनी सरपंचपदी तर त्यांच्या बहीण अश्विनी रामाने यांनी महापौरपदी काम करण्याची संधी दिली होती. सुमन गुरव या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्याची निवड करून त्यांनी गट एकसंघ ठेवला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील