शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

अटी घालून लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:22 IST

..तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल

कोल्हापूर : लाडकी बहीण योजना सुरु झाली त्यावेळी अर्थ खात्याने त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असे लिहिले होते का ? लिहिले होते तर त्यावेळी त्या का घातल्या नाहीत? या अटी व शर्ती आताच का घालता, या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार का ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.आमदार पाटील म्हणाले, शासनाच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींचे अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अटी व शर्ती आताच का घालता? या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे. सत्ता कुणाची आहे यापेक्षा सिस्टिम काय करते, हे महत्त्वाचे आहे. मूळ आरोपी सापडल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. वेगळ्या दिशेने हे प्रकरण घेऊन जात असल्याचा संशय आहे. प्रीपेड मीटरचे २७ हजार कोटींचे टेंडर चार-पाच कंपन्यांना दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपुरते हे थांबवले होते. आता परत हे मीटर बसवणे सुरु झाले. लोकांचा याला विराेध असून, आम्हीही याला विरोध करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले...तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन कार्यक्रमांसाठी पालकमंत्री नसतात तर त्या जिल्ह्याचे आर्थिक नियोजन करण्याची भूमिका पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे खातेवाटप, पालकमंत्री नियुक्तीचा वाद लवकरच मिटावा अन्यथा आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना उपोषणाला बसावे लागेल, अशी कोपरखळी आमदार सतेज पाटील यांनी लगावली.आता रखडलेले प्रश्न मार्गी लावाकोल्हापूरच्या जनतेने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी, मंत्र्यांनी कोल्हापूरचे आयटी पार्क, शाहू मिलचा विस्तार, कोल्हापुरातील रस्त्यांचे नियोजन, रखडलेले प्रकल्प, हातकणंगलेतील लॉजिस्टिक पार्क, गडकिल्ल्यांचे संवर्धन ही कामे पाच वर्षांत पूर्ण करावीत, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी यांचे नियोजित आंदोलन रास्तचकेंद्र शासनाकडे साखरेची एमएसपी वाढवावी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत. एमएसपी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांना चार पैसे जास्त देणे कारखान्यांना परवडणार नाही. प्लेज कर्ज जे मिळते ते शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सरकारला साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यायचे नाहीत. नेमके सरकारचे धोरण काय आहे हेच कळत नाही. त्यामुळे राजू शेट्टी याबाबत आंदोलन करणार असतील तर ते रास्त असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाguardian ministerपालक मंत्री