शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, काँग्रेसचा गटनेता शिंदेसेनेच्या गळाला; मुंबईत घेतली एकनाथ शिंदेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:16 IST

पंधरा वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात

कळंबा : गेली पंधरावर्षे काँगेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे महापालिकेतील गटनेते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी आज, शुक्रवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीतून नाराज देशमुख लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याचे स्पष्ट झाले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जातो.

यावेळी आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम उपस्थित होते. शारंगधर देशमुख यांनी गेली पंधरा वर्षे काँग्रेसचे पालिकेतील नेतृत्व यशस्वीरित्या सांभाळले होते. दोन वेळा सानेगुरुजी वसाहत तर गतवेळी रंकाळा तलाव प्रभागातून शारंगधर देशमुख सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिकेत काँग्रेसचा गटनेता, स्थायी समिती सभापती अशी पदे भूषवली आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु पक्षाने दखल घेतली नसल्याने ते नाराज झाले होते. अखेर आज त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे