भाजप कोल्हापूरतर्फे मोदी यांचे अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST2021-06-09T04:28:56+5:302021-06-09T04:28:56+5:30

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपयुक्त निर्णय घेतल्याबद्दल कोल्हापूर भाजपच्या वतीने मंगळवारी त्यांचे अभिनंदन करण्यात ...

Congratulations to Modi from BJP Kolhapur | भाजप कोल्हापूरतर्फे मोदी यांचे अभिनंदन

भाजप कोल्हापूरतर्फे मोदी यांचे अभिनंदन

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपयुक्त निर्णय घेतल्याबद्दल कोल्हापूर भाजपच्या वतीने मंगळवारी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत दिवाळीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्यामध्ये नोव्हेंबरपर्यंत देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार. १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस, लहान बालकांसाठीच्या लसीची चाचणी असे लोकोपयोगी निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

बिंदू चौक येथील भाजपा कार्यालय प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Congratulations to Modi from BJP Kolhapur