शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

‘ईडी’ कारवाईतून स्वत:सह बँकेलाही वाचविल्याबद्दल अभिनंदन, किसन कुराडे यांचा हसन मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 12:11 IST

'तुम्ही ८१ वर्षांचा उल्लेख केला म्हणजे बँकेची पुढची सभा बघतो की नाही, याची भीती वाटते'

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या मागील सभेत कारवाईबद्दल ‘ईडी’च्या निषेधाचा ठराव आपण मांडला. पण, वर्षभरात स्वत:सह बँकेलाही वाचविले, याबद्दल ‘ शहाणे आणि वेड्यांचे ’ अभिनंदनाचा ठराव मांडतो, असा टोला सभेतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किसन कुराडे यांनी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना लगावला.प्रा. कुराडे बोलण्यास उभे राहिल्यानंतर दीड तास घेऊ नका सर, तुमचे वय ८१ झाले, आपला सहस्रचंद्र सोहळा साजरा करुया, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी डिवचल्यानंतर, तुम्ही ८१ वर्षांचा उल्लेख केला म्हणजे बँकेची पुढची सभा बघतो की नाही, याची भीती वाटते, असे कुराडे म्हणाले. बँक साखर उद्योगाकडे सख्या तर वस्त्रोद्योगाकडे सावत्र भाऊ म्हणून पाहते, असा आरोप त्यांनी केला. यावर, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमतो, तुम्हाला बोलावतो, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. ‘ वर जाण्या अगोदर बोलवा ’ असा टोला कुराडे यांनी लगावला.

बँकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलांना घ्या, अशी मागणी संस्था प्रतिनिधींनी केली. यावर, विधानसभेनंतर भरती करणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. बँकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांना बोलावणार आहे, हे आमदार सतेज पाटील यांनी सुचविल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.तारण साखर विक्री करणाऱ्यांवर कारवाई कराबँकेच्या तारण साखरेची कारखाना व्यवस्थापन परस्पर विक्री कसे करते ? बँकेच्या प्रतिनिधींच्या समोर ५४० क्विंटल साखर विक्री केली जाते, मग बँक काय करते ? कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करा, अशी मागणी जनार्दन पाटील (परिते) यांनी केला.

तारण साखर विक्री करणाऱ्यांवर कारवाई कराबँकेच्या तारण साखरेची कारखाना व्यवस्थापन परस्पर विक्री कसे करते ? बँकेच्या प्रतिनिधींच्या समोर ५४० क्विंटल साखर विक्री केली जाते, मग बँक काय करते ? कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करा, अशी मागणी जनार्दन पाटील (परिते) यांनी केला.संचालकांची मक्तेदारी मोडून काढूजिल्हा बँकेत काही संचालकांकडून विकास संस्थांची अडवणूक होते. त्यासाठी उपोषणाला बसावे लागते, ही मक्तेदारी मोडून काढू, असा इशारा प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.प्रोसेडिंग वाचन आसुर्लेकर समर्थकांनी रोखलेमागील प्रोसेडिंग वाचन संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या समर्थकांनी रोखले. ‘पणन प्रक्रिया’ गटाची फोड करण्याबाबतचा ठरावच झाला नसताना तो मंजूर कसा करता ? अशी विचारणा तुकाराम पाटील, निवास ढोले, दाजी पाटील आदींनी केली. याला सहकार विभागाने मंजुरी दिली असून, हा विषय न्यायालयात आहे, त्यामुळे नामंजूर करता येणार नसल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. साखर कारखाने, सूतगिरण्या, तालुका व जिल्हा पातळीवरील खरेदी-विक्री संघ अशा ७८ संस्थांसाठी दोन जागा आणि उर्वरित ५८५ संस्थांसाठी एक जागा करण्याचा निर्णय सत्तारुढ गटाने घेतला आहे, त्याला बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा आक्षेप आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय