शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह स्टेटस अन् कोल्हापूर तणाव प्रकरणी ६ जणांना अटक; दीपक केसरकरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:24 IST

या प्रकरणी कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली. 

कोल्हापूर- स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून कोल्हापूर शहरात मंगळवारी दोन गटात झालेल्या वादानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. आता स्टेटस ठेवल्या प्रकरणी झालेल्या गोंधळा प्रकरणी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

आक्षेपार्ह स्टेटसवरुन कोल्हापुरात तणाव, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आता कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मी या संदर्भात बैठक घेणार आहे. काल स्टेटसमध्ये आक्षेपार्ह फोटो ठेवल्या प्रकरणी कारवाई करत त्यांना अटक केली. यात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या गर्दीने बाहेर जाऊन गोंधळ केला, या प्रकरणात काही जणांवर केसेस दाखल झाल्या. त्यामुळे आज या केसेस मागे घ्याव्या ही मागणी करत काहीजण आले. यामुळे आज हा गोंधळ झाला. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी मोठा गोंधळ निर्माण झाला असून आतापर्यंत ६ जणांना अटक झाली आहे. या दगडफेक करणाऱ्यांनाही अटक झाली आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. 

"प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे, दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल. कोल्हापूर या प्रकारामुळे बंद राहिले आहे, असे प्रकार चांगले नाहीत, असंही दीपक केसरकर म्हणाले.     

गंजी गल्ली परिसरात दगडफेक

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.

शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद

सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDipak Kesarkarदीपक केसरकरPoliceपोलिस