शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे आडकून पडले असून, या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील वीस कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहिला. विशेष म्हणजे पुणे व सोलापूर या विभागात ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे. राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाची २३ हजार ३२० कोटी ५७ लाख रुपये देय एफआरपी आहे. त्यापैकी २२ हजार ४३ कोटी १३ लाख रुपये पैसे शेतकऱ्यांना आदा करण्यात आले आहेत. अद्याप १२७७ कोटी ४४ लाख रुपये एफआरपी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत. ११७ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली असून, त्यातील २० कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या २९ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

एफआरपी देणारे कारखाने -

एफआरपी टक्केवारी कारखान्यांची संख्या

० टक्के १

१ ते ४९ टक्के ४

५० टक्केपेक्षा अधिक ६८

१०० टक्के ११७

एकूण १९०

सर्वांत कमी एफआरपी देणारे पाच कारखाने

पाणगेश्वर, लातूर -० टक्के

किसनवीर, खंडाळा - ५ टक्के

तासगाव शुगर - २६ टक्के

किसनवीर, भुईंज - ३२ टक्के

भीमा टाकळी, सोलापूर - ४३ टक्के

दृष्टिक्षेपात यंदाचे साखर उत्पादन, लाख टनात -

विभाग हंगाम २०१९-२० हंगाम २०२०-२१ जास्त

कोल्हापूर २३.४१६ २७.७४ ४.३३

पुणे १७.५२ २५.३३ ७.८१

सोलापूर ७.१८ १६.४९ ९.३१

अहमदनगर ५.८७ १६.६९ ११.०२

औरंगाबाद ३.७१ ९.७० ५.९९

नांदेड ३.१२ ९.४० ६.२८

अमरावती ०.४१ ०.५२ ०.११

नागपूर ०.५४५ ०.३९ -०.१५