शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:49 IST

१९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोकण-कर्नाटक आणि गोव्यातील सोन्यासारख्या मौल्यवान खनिजांसाठी केंद्राच्या अखत्यारीत तत्काळ तटस्थ समिती नेमावी, त्यांच्यामार्फत विस्तारित सर्वेक्षण करावे आणि तोपर्यंत या परिसरातील खनिजांची निर्यात पूर्णपणे थांबवून देशाची लूट थांबवावी, अशी मागणी खनिकर्म विभागाचे माजी अधिकारी रामसिंग हजारे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि ज्येष्ठ वकील नंदकुमार पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी पंढरपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याचे सांगितले आहे. पण या जिल्ह्यातच नव्हे तर कोकणासहगोवा आणि कर्नाटक राज्यांतील भूगर्भातही सोन्यासह अन्य मौल्यवान धातू असल्याचे भूगर्भशास्त्राचे अभ्यासक डॉ. एम. के. प्रभू यांनी १९७० मध्ये अंदाज व्यक्त केला होता. १९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत केंद्र सरकारशी त्यांनी पत्रव्यवहारही केला. शिवाजी विद्यापीठातील तत्कालीन कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांनीही छायाचित्रकार अनिल वेल्हाळ, उदय कुलकर्णी, हजारे यांच्यासोबत खनिजांचे नमुने तपासले. त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्र्यासह केंद्रीय खाण मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे दिला होता तरीही याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तत्काळ लोह खनिजाच्या नावावर मौल्यवान धातूच्या निर्यातीतून होणारी देशाची लूट थांबवावी आणि त्याबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, सोन्याबरोबरच प्लॅटिनम, ऑस्मियम व पैलेडियम यासारखे मौल्यवान धातू आढळून येत असलेल्या ‘संदूर पट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या भूभागाचे सर्वकष सर्वेक्षण करा,

सर्व्हे ऑफ इंडिया, ब्युरो ऑफ माईन्स, केंद्र शासनाच्या खनिकर्म अथवा जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना वगळून तत्काळ केंद्राची तटस्थ समिती नेमावी, त्यात यापूर्वी काम केलेल्या शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांचा समावेश करावा आणि शिवाजी विद्यापीठावर या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवावी, यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा निश्चित कालावधीत ते पूर्ण करावे, सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कोकण व गोव्यातील खजिनांची निर्यात पूर्णपणे थांबवावी, आतापर्यंत अब्जावधी रुपयांची लूट झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर देशद्रोह व भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंkonkanकोकणgoaगोवा