कालकुंद्रीतील स्मशानशेडची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:08+5:302021-07-05T04:16:08+5:30
ताम्रपर्णी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत दोन शेड, दोन दाहिनी, मृतांच्या नातेवाइकांना बसण्यासाठी सिमेंट बाक, सिमेंट काँक्रिट व ब्लॉक बसविलेली प्रशस्त ...

कालकुंद्रीतील स्मशानशेडची दुरवस्था
ताम्रपर्णी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत दोन शेड, दोन दाहिनी, मृतांच्या नातेवाइकांना बसण्यासाठी सिमेंट बाक, सिमेंट काँक्रिट व ब्लॉक बसविलेली प्रशस्त जागा, पाण्याची सुविधा, रात्रीच्या वेळी लाईट व्यवस्था, काँक्रिट रस्ता आदी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत.
वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या दोन्ही शेडचे पत्रे गंजून व वादळामुळे निकामी झाली आहेत. दाहिनी युनिटपैकी एक पूर्णपणे निकामी तर दुसरेही नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी मोठी कुचंबणा होत आहे.
गेल्या आठवड्यात दोन दिवसात चौघांचा मृत्यू झाला. त्यावेळेस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. याची ग्रामपंचायत, पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन तत्काळ नवीन बिडाच्या जाळ्या बसविण्याबरोबरच पत्राशेडची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील स्मशान शेडच्या छतावरील पत्रे व बिडाची जाळी व दाहिन्यांची झालेली दुरवस्था. क्रमांक : ०४०७२०२१-गड-०२