शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

अनियमित पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:13 IST

water, problem, kolhapurnews, muncipalty बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, अनियमितता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या; तसेच पाईपलाईनची व उपसा केंद्राजवळील गळती काढण्याचे तत्काळ नियोजन करा, अशा सूचना बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. अध्यक्षस्थानी स्थायी सभापती सचिन पाटील होते.

ठळक मुद्देअनियमित पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारीआवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, अनियमितता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या; तसेच पाईपलाईनची व उपसा केंद्राजवळील गळती काढण्याचे तत्काळ नियोजन करा, अशा सूचना बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. अध्यक्षस्थानी स्थायी सभापती सचिन पाटील होते.पाणीपुरवठा नियोजन व्यवस्थित होत नाही. त्यात अनियमितता निर्माण झाली आहे. अभियंते व चावीवाले फोन उचलत नाहीत. अमृत योजनेचे काम ५० टक्केही पूर्ण झालेले नाही, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. बालिंगा पाणी उपसा केंद्र सारखे बंद पडत आहे. पाण्याचे नियोजन बिघडत आहे याबाबत शारंगधर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.

अंदाजित ४० कोटींची रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यामुळे अमृतमधील कामे मंजूर कामे तातडीने करावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक नियाज खान, माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनीही आपल्या तक्रारी मांडल्या.अमृत योजनेतून १२ पाण्याच्या टाक्या मंजूर आहेत. एक वर्ष होऊन गेले, मुदत संपली तरीही एकाही टाकीचे काम पूर्ण झाले नसून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली.पंपिंग मशिनरी बदलणे, ओव्हरहॉलिंग करणे, फिल्टर हाऊस दुरुस्ती, फिल्टर मीडिया बदलणे, आदी कामांचा सहा कोटी रकमेचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. पाणी उपसा पंपांचा डिस्चार्ज वाढविण्यासाठी नवीन पंपखरेदीचा प्रस्ताव करून पाठविण्यात आलेला आहे, असे जल अभियंता बी. एम. कुंभार यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, उपजल अभियंता रामदास गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :water shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर