शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक, महाडिक यांच्याविरोधात तक्रार; अवमान, आमिषप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 12:00 IST

कोल्हापूर : महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी ...

कोल्हापूर : महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाकपचे शहर सचिव रघुनाथ विष्णू कांबळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मतदारांना आमिष दाखविल्याबाबत तक्रार दिली आहे.रघुनाथ कांबळे यांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, नेसरी (गडहिंग्लज) येथील सभेत खासदार मंडलिकांनी ‘आत्ताचे श्रीमंत शाहू छत्रपती हे खरे वारसदार नाहीत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत’, असे वक्तव्य केले. शाहू छत्रपती हे हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम तसेच कोल्हापूर संस्थानच्या दत्तकसंबंधीच्या कायद्यान्वये, कायदेशीरदृष्ट्या कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक आले आहेत. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे क्लास वन वारस आहेत. त्यामुळे शाहू छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे खरे वारस आहेत.एकाद्या कमी शिकलेल्या माणसाने अशा प्रकारची वक्तव्ये करणे समजू शकलो असतो. मंडलिक हे देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचे सभासद आहेत. ज्या सभागृहात साधकबाधक चर्चा केल्यानंतर कायदे तयार केले जातात. अशा सभागृहाचे सभासद व पेशाने प्राध्यापक असलेल्या मंडलिक यांनी धादांत खोटी, जनतेची व समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याने सामाजिक उपद्रव निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोटी व चुकीचे विधाने केली आहेत. शाहू छत्रपतींची प्रतिमा मलिन करण्याची कृती खासदार मंडलिकांनी केली असल्याने त्यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.मतदारांना आमिषनेसरी येथील भाजपच्या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा केली. या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली. महाडिकांची घोषणा लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२३ मध्ये ‘लाचलुचपत’ या शब्दाची व्याख्या दिली आहे, त्या व्याख्येमध्ये तंतोतंत समाविष्ट होत असल्याचे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक