‘कडकनाथ’ प्रकरणातील कंपनीचे कर्मचारीही पसार ; ‘कडकनाथ’च्या जाळ्यात कोल्हापूरचे हजारावर शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:44 AM2019-08-26T00:44:46+5:302019-08-26T00:50:20+5:30

या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शेतकरी या कंपनीशी संलग्न आहेत.

Company employees also spread in 'Kadaknath' case | ‘कडकनाथ’ प्रकरणातील कंपनीचे कर्मचारीही पसार ; ‘कडकनाथ’च्या जाळ्यात कोल्हापूरचे हजारावर शेतकरी

‘कडकनाथ’ प्रकरणातील कंपनीचे कर्मचारीही पसार ; ‘कडकनाथ’च्या जाळ्यात कोल्हापूरचे हजारावर शेतकरी

Next
ठळक मुद्देतक्रार दाखल करा : राजू शेट्टींचे आवाहनतरी व्यवसाय वाढत गेला तसे नियंत्रण राखता आले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

इस्लामपूर : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित कडकनाथ कोंबडी पालनातून इस्लामपूर शहरासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दहा हजारांवर सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आता धूम ठोकली आहे. ‘लोकमत’ने याचा पर्दाफाश केल्यानंतर सर्वजण खडबडून जागे झाले आहेत. या व्यवसायात ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा शेतकºयांनी पोलिसांत तक्रार करावी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीशी राहील, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा
अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने या बोगस कंपनीच्या संचालकांनी पुणे येथे मुक्काम ठोकला आहे. आता अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कंपनीने १00 रुपयांच्या मुद्रांकावर अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. ‘आमची कंपनी प्रामुख्याने रेशीम, मत्स्य,

कुक्कुटपालन व शेळी पालनाचा व्यवसाय करीत आहे. आमच्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करून देणे तसेच व्यवसायातून उत्पादित होणारा माल खरेदी करणे याबरोबरच शेतकºयांना विश्वास देऊन खरेदीची हमी देते. आमची कंपनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करीत नाही किंवा शेतकºयांना आर्थिक गुंतवणूक देत नाही’, असे नमूद करुन शेतकºयांची फसवणूक केली आहे. या मुद्रांकावर केवळ बोगस स्वाक्षºया आहेत, परंतु त्यावर नावाचा उल्लेख नाही.

‘लोकमत’ने या फसवणुकीचा पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून आणखी बºयाच जणांची फसवणूक झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे. यामुळेच खासदार राजू शेट्टी यांनी संंबंंधित कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार करावी, म्हणजे आम्हाला रितसर कारवाईसाठी प्रयत्न करता येतील, असे आवाहन केले आहे.

आरोग्यदृष्ट्या फायदेशीरचा दावा

कडकनाथ कोंबडीची जात मध्य प्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. ही कोंबडी काळी, तिचे रक्त काळे, मांस काळे आणि होणारा रस्साही काळा असल्यामुळे या कोंबडीचे अनेकांना आकर्षण वाटते. वैद्यकीयदृष्ट्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. कंपन्यांनी त्याबाबतची जाहिरातबाजीही केली होती. कोंबडी आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असल्याची बाब या व्यवसायासही फायदेशीर ठरली. कंपन्या असा दावा करीत असल्या तरी, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी याबाबत कोणताही अधिकृत दावा केलेला नाही. सांगली, इस्लामपूर येथील काही डॉक्टरांना याविषयी विचारले असता त्यांनी, कडकनाथ कोंबडीच्या आरोग्यविषयक दाव्याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

कोल्हापूर : ‘एका’ अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी पोबारा केल्याने कोल्हापुरातील ‘कडकनाथ’ पक्षी पालक शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात केली आहे. इतर व्यवसायापेक्षा जास्त नफा यामध्ये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी उड्या घेतल्या; पण गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीकडून प्रतिसादच मिळत नसल्याने शेतकºयांची घालमेल वाढली होती. अलीकडे कमी कष्टात जास्त नफा देणा-या कंपन्या रोज उदयास येत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘एक’ अ‍ॅग्रो कंपनी होती.

सुरुवातीच्या टप्प्यात मत्स्य व शेळीपालनमध्ये कंपनीने काम सुरू केले. नंतर ‘कडकनाथ’ कोंबडी पालनात उतरली. ‘कडकनाथ’च्या मांसाला परदेशात मोठी मागणी असल्याने कंपनीने मूळ व्यवसाय बाजूला ठेवून यामध्ये लक्ष केंद्रित केले. तीन महिन्यांत लाखोंचा नफा मिळणार असल्याने शेतकऱ्यांनीही उड्या घेतल्या. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शेतकरी या कंपनीशी संलग्न आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. ते पाहून इतर शेतकºयांनीही या व्यवसायात उड्या घेतल्या. शेतकºयांची संख्या वाढत गेली; पण कंपनीला नियंत्रण ठेवता आले नाही. दोन महिन्यांपासून पक्षांना खाद्य पुरवठा करता येईना, पक्षांचा उठाव होत नव्हता, तेव्हापासून शेतकºयांच्या तक्रारी सुरू झाल्या. पक्षांची संख्या वाढल्याने खाद्यपुरवठा होत नाही; त्यामुळे शेतकºयांनी खाद्य बाहेरून खरेदी करावे, त्यांना बिले दिली जातील, असे कंपनीने सांगितले. काही शेतकºयांना थोडे दिवस बिले दिलीही, पण नंतर बहुतांशी शेतकरी अडकले. कंपन्यांच्या अधोगतीला संचालकांची उधळपट्टी कारणीभूत असली, तरी व्यवसाय वाढत गेला तसे नियंत्रण राखता आले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

अंंडे ६० रुपये...
‘ही’ कंपनी शेतकऱ्यांकडून ५० ते ६० रुपये दराने अंडी घेत होती. त्याची उबवण करून पुन्हा पक्षी तयार केले जायचे; पण बाजारात या अंड्याचा दर १0 ते १५ रुपये होता; त्यामुळेही कंपनीला फटका बसल्याचे जाणकारांचे मत आहे.


मांस विक्रीचे मार्केटही चुकले
कडकनाथ कोंबड्याच्या मांसाला परदेशातही मागणी आहे. ही कंपनी तिथेपर्यंत पोहोचलीच नाही. उत्पादनाच्या प्रमाणात पुढे मालाचा उठाव झाला नाही, हेही कंपनी आतबट्ट्यात येण्याचे कारण आहे.

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ
‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ‘कडकनाथ’चा ५00 कोटींचा गंडा’ हे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये एकच खळबळ उडाली. कडकनाथ पक्षी पालक दिवसभर संबंधित कंपनीच्या संपर्कात होते. तुम्हाला पैसे दिले जातील, तुम्ही कोठेही तक्रार करू नका, असे कंपनीच्या वतीने शेतकºयांना सांगण्यात आले.

 

या कंपनीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत. या कंपनीतील एकाही संचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न करू नये.
- विक्रम पाटील, पक्षप्रतोद, विकास आघाडी.

 

Web Title: Company employees also spread in 'Kadaknath' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.