राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारच : माळी

By Admin | Updated: September 4, 2014 00:04 IST2014-09-04T00:03:27+5:302014-09-04T00:04:04+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता गणेश माळी

Commonwealth Games gold medal: Mali | राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारच : माळी

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारच : माळी

जयसिंगपूर : कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांची सदिच्छा याच्या जोरावर पुढील राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकणारच, असा विश्वास राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता गणेश माळी याने व्यक्त केला.
येथील शाहूनगरमधील शिवशक्ती कॉलनी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात माळी बोलत होता. सर्जेराव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी गणेश माळी, प्रशिक्षक प्रदीप पाटील, चंद्रकांत माळी, सदाशिव माळी, ओंकार ओतारी याचे कुटुंबीय यांच्याबरोबर छत्रपती पुरस्कार विजेते सदाशिव माने, ऐतिहासिक वास्तुसंग्राहक गिरीश जाधव व खेळाडू प्रमोद पाटील यांचा उद्योगपती विनोद घोडावत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्योगपती विनोद घोडावत यांनी शिवशक्ती कॉलनी उत्सव मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून देशाचे व आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Commonwealth Games gold medal: Mali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.