शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचे ‘मिशन हॉलिडे’

By admin | Updated: February 23, 2015 00:29 IST

सुटीदिवशी झाडाझडती : झूम, एसटीपी, पंचगंगेसह रस्त्यांची पाहणी

कोल्हापूर : महापालिक ा आयुक्त पी. शिवशंकर यांनी लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), टाकाळा खण, पंचगंगा घाट, स्मशानभूमी आदी परिसराची रविवारी सुटीच्या दिवशी पाहणी केली. एसटीपी पाईपलाईन, टाकाळा खणीत झूम येथील प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास अग्रक्रम द्या, रखडलेले सर्वच प्रकल्प पावसाळ्यापूर्वी जलद गतीने हालचाल करत मार्गी लावा, असे आदेश दिले. सुटीच्या दिवशी आयुक्तांनी अचानक झाडाझडती घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली. रविवारची सुटी असूनही सकाळी अकरा वाजल्यापासून आयुक्त पी. शिवशंकर यांनी पाहणी सुरू केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील व आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते. पंचगंगा स्मशानभूमीत ‘बेड’ची संख्या कमी आहे. ती वाढविण्याबाबत नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करून येत्या दोन महिन्यांत ही कामे मार्गी लावण्याबाबत काय करता येईल, याबाबत ठेकेदार व अधिकाऱ्यांशी आयुक्तांनी चर्चा केली. दुपारी आयुक्त झूम प्रकल्पावर पोहोचले. नागरिकांनी झूममधील कचरा पेटविल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल गाऱ्हाणी मांडली. कचरा उठाव कधी करायचा तेव्हा करा, मात्र कचरा पेटविणे किमान थांबवा, अशी विनंती नागरिकांनी केली. (प्रतिनिधी)आयुक्तांचा दणका...आयुक्तांनी केलेल्या झाडाझडतीमुळे भेदरलेल्या आरोग्य विभागाने तत्काळ नागरिकांसाठी जाहीर आवाहन प्रसिद्धीस दिले. यामध्ये पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ तलाव, रंकाळा, आदी ठिकाणी प्रदूषण होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. धुणी धुण्यासाठी रंकाळा धुण्याची चावी, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, बेलबाग, आदी ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली आहे, याचा वापर करावा. नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जाग्यावर आदेश...पंचगंगा व राजाराम बंधारा येथे धुण्याची स्वतंत्र व्यवस्था करा.नदीत दूषित पाणी किंवा कचरा थेट टाकणाऱ्यांवर कारवाई करारंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याबाबत ड्रेनेज विभागाने तत्काळ अंमलबजावणी करावी.टाकाळा खणीचे काम मार्चअखेर पूर्ण करा.झूम प्रकल्प येथे वीजनिर्मिती प्रकल्पास जागा उपलब्ध करा.झूम प्रकल्पातील प्रक्रिया केलेला कचरा टाकाळा खणीत टाकण्याचे मार्चअखेर नियोजन झालेच पाहिजे.स्मशानभूमीच्या नुतनीकरणाचा स्वतंत्र आराखडा करा.केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान दुरुस्ती महिन्यात मार्गी लावा.एसटीपी प्रकल्पाच्या खुदाई कामासाठी महापालिकेतर्फे आणखी एक पोकलॅन मशीन लावा, त्याचे पैसे ठेकेदाराच्या बिलातून घ्या पण, काम पंधरा दिवसात पूर्ण करा.