वाणिज्य बातमी : टर्फ मैदानामुळे शिवाजी पेठेतील फुटबॉलला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:37+5:302021-02-05T07:09:37+5:30
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील गांधी मैदानात आधुनिक पद्धतीचे मल्टी स्पोर्ट्स टर्फ मैदान विकसित केले आहे. यामुळे पेठेतील फुटबॉलला चालना ...

वाणिज्य बातमी : टर्फ मैदानामुळे शिवाजी पेठेतील फुटबॉलला मिळणार चालना
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील गांधी मैदानात आधुनिक पद्धतीचे मल्टी स्पोर्ट्स टर्फ मैदान विकसित केले आहे. यामुळे पेठेतील फुटबॉलला चालना मिळणार आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. पेठेतील फुटबॉल टिमसाठी रोज दोन तास मैदान मोफत उपलब्ध होणार आहे.
कोल्हापुरातील शिवाजी पेठेला वेगळा इतिहास आहे. पेठेने विविध पातळीवर राज्यात नव्हे तर देशात आणि परदेशात ठसा उमटवला आहे. खेळात म्हणाल तर फुटबॉलमधील अनेक खेळाडूंनी पेठेचा नावलैकिक केला आहे. येथील प्रत्येकाच्या मनात फुटबॉल बसला आहे. सध्या गांधी मैदानात फुटबॉलचा सराव केला जातो. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांची नेहमी मैदानाच्या विकासासाठी धडपड सुरू असते. त्यांनी लाखो रुपयांचा निधी खेचून आणला आहे. मैदान सखल भागात असल्यामुळे पावसळ्यात येथे तळ्याचे स्वरुप येते. अशा वेळी खेळाडूंना सरावाला अडचणीचे ठरते. याचाच विचार करून रविकिरण इंगवले यांनी मैदानाच्या उंचावर असणाऱ्या भागात टर्फ मैदान उभारण्याचा निर्णय घेतला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्याने नियोजन मंडळातून नावीन्यपूर्ण योजनेतून ७० लाखांचा निधी आणला. टर्फ मैदान पूर्ण झाले असून नुकतेच शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले.
चौकट
टर्फ मैदानाचे वैशिष्ट्य
शिवाजी पेठेतील पहिले टर्फ मैदान
रोज दोन तास पेठेतील खेळाडूंसाठी मोफत
पेठेतून आंतराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू तयार होण्यास मदत
सरावावेळी दुखापत होणार नाही.
प्रतिक्रिया
शिवाजी पेठेतील फुटबॉल खेळाडूंना अंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी त्यापद्धतीने सुविधा देणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात गांधी मैदानात पाणी साचत असल्यामुळे फुटबॉल खेळाडूंना सरावाला अडचण येत होती. या सर्वाचा विचार करून टर्फ मैदानाची उभारणी केली. पेठेतील टिमना रोज सकाळी ७ ते ९ असे दोन तास येथे सरावासाठी मैदान मोफत उपलब्ध असणार आहे.
रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना
फोटो : २८०१२०२१ कोल गांधी मैदान न्यूज १
ओळी : शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथे ७० लाखांच्या निधीतून आधुनिक पद्धतीचे टर्फ मैदान विकसित केले आहे. लवकरच फुटबॉल खेळाडूंसाठी मैदान खुले होणार आहे.
छाया : नसीर अत्तार
.