वाणिज्य बातमी आवश्यक... केम्लिनचे आळवेकर यांचा तासकर उद्योजक पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:13+5:302020-12-15T04:40:13+5:30
लघु उद्योजकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण, व्यापारीदृष्ट्या यशस्वी झालेल्या उद्योजकांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा केम्लिनच्या ...

वाणिज्य बातमी आवश्यक... केम्लिनचे आळवेकर यांचा तासकर उद्योजक पुरस्काराने गौरव
लघु उद्योजकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण, व्यापारीदृष्ट्या यशस्वी झालेल्या उद्योजकांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा केम्लिनच्या मिलिंद आळवेकर यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. स्वागत परिषदेच्या गडहिंग्लज विभागाचे कार्यवाह प्रा. शि. दु. पदम्न्नवर यांनी, पुरस्कार वाचन सहकार्यवाह डाॅ. एस. के. नेर्ले यांनी केले. आळवेकर यांचा सत्कार प्राचार्य कल्याणराव पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला. विश्वनाथ धूप यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेंद्र देसाई, सचिन वाचणकर, अरुण कुरबेट्टी, सायली दोशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी भास्कर फडणीस, प्रा. दिशा पाटील, नामदेवराव चव्हाण, बाळासाहेब आळवेकर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
फोटो : १४१२२०२०-कोल-मिलिंद आळवेकर
आेळी : मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लजचे उपाध्यक्ष राजेंद्र दोशी यांच्या हस्ते केम्लिन पंप्स ॲन्ड व्हाॅल्वजचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आळवेकर यांना सु. त्रि. तासकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.