वाणिज्य वृत्त: निर्मिती प्रकाशनतर्फे ५० टक्के किमतीत पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:04+5:302021-01-18T04:22:04+5:30
कोल्हापूर : निर्मिती व संवाद प्रकाशन, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचारमंच आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटतर्फे कोल्हापुरात रविवारपासून ग्रंथ ...

वाणिज्य वृत्त: निर्मिती प्रकाशनतर्फे ५० टक्के किमतीत पुस्तके
कोल्हापूर : निर्मिती व संवाद प्रकाशन, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचारमंच आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटतर्फे कोल्हापुरात रविवारपासून ग्रंथ प्रदर्शन सुरू झाले. उमा टॉकीजजवळील विचारमंचच्या कार्यालयात १४ मार्चपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात पुस्तकांवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात गौैतम बुद्ध, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, शहीद भगतसिंग, संत नामदेव, सावित्रीबाई फुले यांच्यासह भारतीय संविधान, स्पर्धा परीक्षाविषयक, शेती, कामगार, सामाजिक चळवळीवरील पुस्तके खरेदी करता येणार आहे. या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन अनिल म्हमाने, शोभा चाळके, मंदार पाटील, सुरेश केसरकर, करुणा मिणचेकर, दयानंद ठाणेकर यांनी केले आहे.