वाणिज्य वृत्त : श्रध्दानंद हॉलमधील माधुरी वुलनच्या स्वेटर्स प्रदर्शनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:14+5:302021-01-08T05:14:14+5:30
कोल्हापूर : स्वेटर विश्वातील नामांकित ब्रॅण्ड बनलेल्या ‘माधुरी वुलन्स’च्या लक्ष्मीपुरीतील श्रध्दानंद हॉलमधील प्रदर्शनाला चोखंदळ ग्राहकांकडून भरघाेस प्रतिसाद मिळत आहे. ...

वाणिज्य वृत्त : श्रध्दानंद हॉलमधील माधुरी वुलनच्या स्वेटर्स प्रदर्शनाला प्रतिसाद
कोल्हापूर : स्वेटर विश्वातील नामांकित ब्रॅण्ड बनलेल्या ‘माधुरी वुलन्स’च्या लक्ष्मीपुरीतील श्रध्दानंद हॉलमधील प्रदर्शनाला चोखंदळ ग्राहकांकडून भरघाेस प्रतिसाद मिळत आहे. हजर स्टॉकवर १० ते ३० टक्क्यांपर्यंत तर स्टॉक क्लिअरन्सवर ५० टक्के अशी भरघोस सूट देण्यात आली आहे. नानाविध डिझाईन आणि उत्कृष्ठ गुणवत्तेमुळे येथे स्वेटर खरेदी करण्याला ग्राहकांकडून पहिली पसंती दिली जात आहे.
मालती बेडेकर यांनी ‘माधुरी वुलन्स’ नावाने ३२ वर्षांपूर्वी रमण मळा येथे स्वेटर्सची विक्री सुरु केली. आज त्याचे भव्य दालन झाले आहे. त्यांच्या सुना आरती व स्नेहल हा व्यवसाय पुढे चालवत आहेत. हिवाळ्यात लक्ष्मीपुरीतील श्रध्दानंद हॉलमध्ये स्वेटर्सचे प्रदर्शन भरते. या प्रदर्शनात लेडीज कार्डीगन्स, जेन्टस्, मुलांचे स्वेटर्स, बेबी सेटस्, पॉन्चो, स्टोल, हॅण्डग्लोव्हज्, ब्लॅंकेट्स, कार्पेट्स, ब्रॅण्डेड जॅकेट्स असा भरपूर स्टॉक उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.
फोटो: ०६०१२०२१-कोल-माधुरी वुलन्स