वाणिज्य : कृषिचँग ऊसतोडणी यंत्राची उद्या प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:33+5:302020-12-05T04:58:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे कृषिचँग ऊसतोडणी यंत्र आता कोल्हापुरातही उपलब्ध झाले आहे. त्याचे ...

वाणिज्य : कृषिचँग ऊसतोडणी यंत्राची उद्या प्रात्यक्षिके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे कृषिचँग ऊसतोडणी यंत्र आता कोल्हापुरातही उपलब्ध झाले आहे. त्याचे तोडणी प्रात्यक्षिक रविवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता नरके कॅम्प, कसबा बोरगांव (ता.पन्हाळा) येथे आयोजित केले आहे. थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रात्यक्षिक होत आहे. त्याला शेतकरी, वितरक व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
हे मूळ यंत्र थायलंडचे असून त्याच्याशी कोल्हापूर ऑटो वर्क्सने सहयोग करून ते उपलब्ध करून दिले आहे. सध्या वापरात असलेल्या यंत्रांपेक्षा हे यंत्र शेतकऱ्यांच्या व कारखान्यांच्या दृष्टीनेही फारच उपयुक्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तो एखादा शेतकरी, गावातील सेवा संस्था किंवा ग्रामस्थ एकत्र येऊन यंत्र विकत घेऊ शकतात. हे यंत्र उसाचे पूर्ण तुकडे करत नाही. ऊस जमिनीपासून उत्तम पद्धतीने तोडते व त्याचवेळी मजूर तोडतात तसे त्याचे वाडेही वेगळे करते. हे यंत्र वापरण्यास सुलभ आहे. ते कोणत्याही ट्रॅक्टरला जोडता येऊ शकते. त्यासाठी ट्रॅक्टरचालकासह तिघांचीच गरज भासते. आता यंदाही ऊसतोडणी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी हे यंत्र उत्तम पर्याय ठरू शकेल असे कोल्हापूर ऑटोचे संचालक तुषार शेळके यांनी सांगितले.
फोटो : ०४१२२०२०-कोल-कृषिचँग यंत्र
(विश्र्वास पाटील)