शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Ganpati Festival -कोल्हापूरातील ६0 हून अधिक मंडळांमध्ये पंजे, गणेशमूर्तींची एकत्रित प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:22 IST

कोल्हापूर शहरातील ६0 हून अधिक तालीम संस्था व तरुण मंडळांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी गणेशमूर्ती व पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरातील ६0 हून अधिक मंडळांमध्ये पंजे,गणेशमूर्तींची एकत्रित प्रतिष्ठापना१५० हून अधिक ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना केली जाते

कोल्हापूर : शहरातील ६0 हून अधिक तालीम संस्था व तरुण मंडळांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी गणेशमूर्ती व पंजांची एकत्रित प्रतिष्ठापना केली जाणार आहे.ऐक्याची वीण जपणारे व सामाजिकतेचे झालर असलेले शहर म्हणून कोल्हापूरकडे संपूर्ण देशभरातून पाहिले जाते. त्यात यंदा गणेशोत्सव व मोहरम सण एकत्रित आला आहे. त्यानुसार शहरातील मानाचा पंजा म्हणून बाबूजमाल दर्ग्यातील नाल्या हैदर पंजाकडे पाहिले जाते. या पंजाची प्रतिष्ठापना रविवारी उशिरा रात्री झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवसांपासून इतर मानाच्या पंजांची प्रतिष्ठापना केली जाते.

यात शिवाजी पेठेतील चाँदसाहेब पंजा, लक्ष्मीपुरीतील गरीबशहा पंजा, काळाईमाम तालीमचा जादुई कलम पंजा, तेली गल्लीतील शेवाळेंचा पंजा, खरी कॉर्नर येथील अवचित पीर तालीम मंडळाचा पंजा, बोडके तालमीचा राजेबागस्वार पंजा, जुना बुधवार पेठ तालीमचा झिमझिमसाहेब पंजा, शुक्रवार पेठेतील चाबुकस्वार पंजा, राजारामपुरीतील मातंग वसाहतीतील गैबी पंजा, नंगीवली तालीम मंडळचा झिमझिमसाहेब पंजा, भोई गल्लीतील मलिकाजान पंजा, शाहूपुरीतील हसन-हुसेन पंजा, असे १५० हून अधिक ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना केली जाते.

यात खंडोबा तालीम, जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, पुलगल्ली, सणगर गल्ली तालीम मंडळ, आदी ६० हून अधिक ठिकाणी गणेशमूर्ती व पंजे एकत्रित प्रतिष्ठापना होणार आहे, तर काही ठिकाणी दोन्हींचीही प्रतिष्ठापना झाली आहे.दरम्यान, शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यातील मानाचा अली झुल्फीकार व बेबी फातीमा पंजाची प्रतिष्ठापना गुरुवारी सायंकाळी केली जाणार आहे, तर दर्शनासाठी हा पंजा शुक्रवारपासून भक्तांकरिता खुला केला जाणार आहे.

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर