शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत - सुनील कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:14 IST

जनसामान्यांचे जीवनमान, पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि स्वच्छतेशी संबंधित मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहभाग घेऊन प्रयत्न करणे

ठळक मुद्देकेआयटी’मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभअभ्यासक्रमातून मिळविलेले ज्ञान व कौशल्य हे सामाजिक विकास व पर्यावरण संवर्धनासाठी वापरावे.

कोल्हापूर : जनसामान्यांचे जीवनमान, पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि स्वच्छतेशी संबंधित मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहभाग घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘केआयटी’चे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी येथे केले.

केआयटी कॉलेजमधील ग्लोबल अँड नॅशनल पर्स्पेक्टिव्ह आॅफ सस्टेनेबल सॅनिटेशन अप्रोचेस अँड टेक्नॉलॉजी इंटरव्हेंशन्स या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. यावेळी म्हैसूरच्या जेएसएस विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा. डॉ. के. एस. लोकेश प्रमुख उपस्थित होते. ‘केआयटी’चा पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व राष्ट्रीय नगर कार्य संस्थान यांच्यावतीने हा अभ्यासक्रम आयोजित केला आहे. डॉ. कुलकर्णी म्हणाले,

अभ्यासक्रमातून मिळविलेले ज्ञान व कौशल्य हे सामाजिक विकास व पर्यावरण संवर्धनासाठी वापरावे. डॉ. लोकेश यांनी मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधा याविषयी विचार मांडले. त्यांनी इको टॉयलेटची संकल्पना मांडली. एकंदरीत सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ परिसर या मूलभूत गोष्टींमध्ये असणारा लोकसहभाग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी केआयटीच्या ३५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. पर्यावरण अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अक्षय थोरवत यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती सांगितली. किरण केडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवी निकम यांनी आभार मानले.कोल्हापुरात केआयटी कॉलेजमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रारंभावेळी प्रा. डॉ. के. एस. लोकेश यांचे स्वागत सुनील कुलकर्णी यांनी केले. यावेळी व्ही. व्ही. कार्जिन्नी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय