तहसीलदार-नायब तहसीलदारांनी घेतली सामूहिक रजा; विभागीय आयुक्तांना निवेदन

By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 5, 2023 07:56 PM2023-12-05T19:56:27+5:302023-12-05T19:56:44+5:30

नायब तहसीलदारांचे ग्रेड पे ४ हजार ८०० रुपये वाढवून मिळावे या मागणीसाठी मागील आठवड्यापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Collective leave taken by Tehsildar-Naib Tehsildar; Statement to the Divisional Commissioner | तहसीलदार-नायब तहसीलदारांनी घेतली सामूहिक रजा; विभागीय आयुक्तांना निवेदन

तहसीलदार-नायब तहसीलदारांनी घेतली सामूहिक रजा; विभागीय आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रेड पे वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा घेऊन शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार व नायब तहसीलदारांचे केबिन रिकामी होते. तसेच सदर मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले.

नायब तहसीलदारांचे ग्रेड पे ४ हजार ८०० रुपये वाढवून मिळावे या मागणीसाठी मागील आठवड्यापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा घेतली. यापुढेही वेगवेगळ्या टप्प्यावर आंदाेलन केले जाणार असून, दि.२८ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले. यावेळी संजय शिंदे, मदन जोगदंड, दिगंबर सानप, मनीषा माने, संजय मधाळे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील संघटनेचे प्रमुख नायब तहसीलदार उपस्थित होते.

Web Title: Collective leave taken by Tehsildar-Naib Tehsildar; Statement to the Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.