शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रोज आठशे लिटर दुधाचं रूपालीच्या रिक्षातून संकलन

By admin | Updated: March 7, 2017 22:55 IST

खराडेतील महिलेची यशोगाथा : डेअरी व्यवसाय; दररोज आठ गावांत रपेट

संजय पाटील --- कऱ्हाड ‘चूल आणि मुलं’ हेच स्त्रियांचं काम, असं आत्तापर्यंत म्हटलं जायचं; पण सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिलाही उंबरठ्याबाहेर पडल्या असून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करताना दिसतायत. खराडे, ता. कऱ्हाड येथील रूपाली जाधव यांनीही प्रापंचिक जबाबदारी सांभाळत डेअरी व्यवसायात स्वत:चे नाव निर्माण केले आहे. पतीसोबत त्याही हा व्यवसाय हिंमतीने सांभाळत आहेत. खराडे येथील रूपाली जाधव यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे सासर खराडे तर माहेर मत्यापूर-नागठाणे. तेरा वर्षांपूर्वी त्यांचा खराडेतील बजरंग जाधव यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीच्या काळात दोघेही शेती करत होते. त्यानंतर बजरंग जाधव यांनी सायकलवरून दूध संकलन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते गावातच दूध संकलन करीत होते. कालांतराने त्यांचा हा व्यवसाय विस्तारला. रूपाली यांनीही घरकाम करीत व शेती सांभाळत या व्यवसायात पतीला मदत करण्यास सुरुवात केली. या दाम्पत्याने सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय फक्त खराडे गावापुरता मर्यादित सुरू केला. त्यानंतर त्याचा विस्तार त्यांनी माल वाहतूक रिक्षा घेतली. या रिक्षातून त्यांनी दूध संकलन सुरू केले. सुरुवातीला बजरंग जाधव हे दूध संकलनासाठी रिक्षा घेऊन जात होते. तर रूपाली घरातील जबाबदारी पाहत होत्या. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत व्याप वाढल्याने बजरंग यांनी रिक्षावर चालक नेमला. संबंधित चालक दररोज परिसरातील गावातून दूध संकलन करीत होता. काहीवेळा रूपाली याही चालकाच्या मदतीसाठी जात होत्या. त्यादरम्यान पती बजरंग यांची मदत घेऊन रूपाली रिक्षा चालविण्यास शिकल्या. काही महिन्यांनंतर चालकाने काम बंद केल्यामुळे जाधव यांचा दूध संकलनाचा व्यवसाय ठप्प झाला. घरात रिक्षा असूनही फक्त चालक नसल्यामुळे दूध संकलन थांबले. अखेर रूपाली यांनी संकलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद पडू द्यायचा नाही, असा निर्धार करीत त्या एकट्याच रिक्षा घेऊन दूध संकलनासाठी बाहेर पडल्या. खराडे गावाबरोबरच चिंचणी, हेळगाव, वाण्याचीवाडी, कचेरवाडी, हणबरवाडी, बेलवाडी, कालगाव आदी गावांतून त्यांनी दूध संकलन सुरू केले. दूध संकलनासाठी रूपाली सकाळी साडेसात वाजता घरातून बाहेर पडायच्या. त्यापूर्वी घरकाम, जेवण, धुणीभांडी आदी कामे आटोपली जायची. घरातील कामे आटोपल्यानंतर रिकामे कॅन रिक्षामध्ये भरून त्या घराबाहेर पडायच्या. दूध संकलन करायच्या व अकरा वाजेपर्यंत परत घरी यायच्या. दररोज आठशे लिटर दूध संकलनखराडेसह आसपासच्या गावात दररोज सकाळी रूपाली जाधव आपली रिक्षा घेऊन जातात. संबंधित रिक्षात रिकामे कॅन ठेवलेले असतात. प्रत्येक शेतकऱ्याकडील दूध घेऊन ते मोजायचे व कॅनमध्ये भरायचे काम रूपाली यांनाच करावे लागते. त्या दररोज सातशे ते आठशे लिटर दूध संकलित करतात. खराडे, ता. कऱ्हाड येथील रूपाली जाधव या रिक्षातून दूध संकलन करतात.