महास्वच्छता अभियानात अर्धा टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:34 IST2021-06-13T18:32:38+5:302021-06-13T18:34:31+5:30

Muncipal Corporation Kolhapur : कोल्हापूर शहरात रविवारी झालेल्या महास्वच्छताअभियानामध्ये अर्धा टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. अभियानाचा १११ वा रविवार होता. त्यामध्ये मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, स्वच्छता दूत अमित देशपांडे व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून सहभाग नोंदविला.

Collect half a ton of waste and plastic in the Mahasvachchata Abhiyan | महास्वच्छता अभियानात अर्धा टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

महास्वच्छता अभियानात अर्धा टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

ठळक मुद्देमहास्वच्छता अभियानात अर्धा टन कचरा व प्लॅस्टिक गोळा​​​​​​​ महापालिकेच्या ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतला भाग

कोल्हापूर : शहरात रविवारी झालेल्या महास्वच्छताअभियानामध्ये अर्धा टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. अभियानाचा १११ वा रविवार होता. त्यामध्ये मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, स्वच्छता दूत अमित देशपांडे व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून सहभाग नोंदविला.

रविवारच्या अभियानात के.एस.बी.पी. गार्डन चौक ते मिलेट्री कॅम्प मेन रोड,जिल्हाधिकारी कार्यालय ते शिये फाटा, कसबा बावडा मुख्य रस्ता, शाहू समाधी स्मारक स्थळ व कोटीतीर्थ तलाव परिसर येथे करण्यात आली.
अभियान तीन जेसीबी, तीन डंपर, दोन आर.सी. गाडया, तीन औषध फवारणी यंत्रांचा वापर करण्यात आला.

महापालिकेच्या ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक मनोज लोट, निखिल पाडळकर, ऋषिकेश सरनाईक, महेश भोसले, सुशांत कावडे, करण लाटवडे, दिलीप पाटणकर, नंदकुमार पाटील, शुभांगी पोवार उपस्थित होते.

Web Title: Collect half a ton of waste and plastic in the Mahasvachchata Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.