शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: कर्जाला कंटाळले, जिवलग मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:22 IST

दोघा जिवलग मित्रांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

दिलीप चरणे

नवे पारगाव : पारगाव (ता. हातकणंगले) येथे कर्जाला कंटाळून दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. विनायक शिवाजी पाटील (वय ४०) व बाबासाहेब हिंदुराव मोरे (४२. दोघेही रा. बिरदेवनगर. ता. हातकणंगले ) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना आज, सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली झाली आहे.या बाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनायक पाटील व बाबासाहेब मोरे हे बिरदेवनगर येथे शेजारी रहातात. दोघांच्यात घनिष्ठ मैत्री होती. एकाच मोटरसायकल वरून ते फिरत असत. आज दुपारी एकच्या सुमारास तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या दक्षिण बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.विनायक पाटील यांचा ट्रकने चिरा ओढण्याचा व्यवसाय होता. तर बाबासाहेब मोरे यांचा जनावरांचा गोटा आहे. दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणत व त्याची विक्री करत असत. दोघांवरही कर्जाचा डोंगर असल्याने आर्थिक चनचन होती. या नैराश्येतूनच त्यांनी आज गळफास घेवून जीवन संपवले. विनायक यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व दहा दिवसांची मुलगी आहे. बाबासो मोरे यास आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती कांबळे यांनी उत्तरीय तपासणी केली. वडगावचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार जावेद रोटीवाले व रणवीर जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस