शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 5:48 PM

कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत महापालिका व जिल्हा परिषदेकडील २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे हा परिसर एकदम चकाचक झाला. ​​​​​​​

ठळक मुद्देराजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छतामहानगरपालिका, जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत महापालिका व जिल्हा परिषदेकडील २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे हा परिसर एकदम चकाचक झाला.प्रचंड प्रमाणात साठलेला कचरा, निर्माल्य, पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या व बाटल्या यांसह पंचगंगा नदीपात्रामध्ये निर्माण होत असलेले केंदाळ व पाण्यामधील न विरघळलेला ओला कचरा एकत्रित करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीपात्राच्या पश्चिम बाजूस जिल्हा परिषदेच्या वतीने तसेच पूर्व बाजूस महापालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.नदीकाठावर असलेल्या दत्तमंदिरालगतच्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा अस्ताव्यस्तपणे विखुरला गेला होता. या ठिकाणी स्वत: आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांनी कचरा एकत्र करून तो खतनिर्मितीसाठी पाठविला.परिसराची स्वच्छता केल्यानंतर औषध फवारणी करून डीडीटी पावडर मारण्यात आली. तसेच टँकरद्वारे पाणी फवारणी करण्यात आली. मोहिमेत बावडा पंचगंगा नदीघाटावर उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या उपक्रमाचे कौतुक केले.पंचगंगा घाटावर कपडे धुणाºया नागरिकांनी पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; शक्यतोवर नदीपात्रामध्ये कपडे धुऊ नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. याप्रसंगी आयुक्त कलशेट्टी यांनी यापुढे परिसरात कचरा टाकताना आढळून आल्यास संबंधितांची नावे महापालिकेकडे द्यावीत; म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, अशा सूचना आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांना दिल्या.मोहिमेमध्ये आयुक्त कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, नगरसेवक सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, संदीप नेजदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, करवीरचे बीडीओ सचिन घाटगे, प्रभारी अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्टेशन आॅफिसर दस्तगीर मुल्ला, परवाना अधीक्षक राम काटकर, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, केएमसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश गवळी, सी. एम. फेलो आकांक्षा नरोदे व रोहिणी कळंबे, वडणगे सरपंच सचिन चौगुले, ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी विजय नलवडे, सदस्य सयाजी घोरपडे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, कसबा बावडा येथील पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य, आरोग्य निरीक्षक व आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग व अग्निशमन विभागाकडील अधिकारी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर